धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:04 IST2025-06-12T13:02:31+5:302025-06-12T13:04:50+5:30
RRR फेम राम चरणच्या आगामी सिनेमाच्या सेटवर हा मोठा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ बघून सर्वांना धक्का बसलाय. सर्व सुरक्षित असतील, अशी आशा आहे

धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं?
एका सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. हैदराबादच्या शमशाबादजवळ राम चरण निर्मित आगामी ‘द इंडिया हाऊस’ सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. अॅक्शन सीन शूट करताना सेटवरील मोठी पाण्याची टाकी अचानक फुटून ही दुर्घटना घडली. भलीमोठी पाण्याची टाकी फुटल्याने एका सेकंदात सेटवर पूरासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सेट अस्ताव्यस्त झाला. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले.
पाण्याची मोठी टाकी फुटली अन्...
सेटवर अचानक ओढवलेल्या या अपघातामुळे अनेक क्रू मेंबर्स जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, एक असिस्टंट कॅमेरा मॅन या दुर्घटनेत गंभीर जखम झाला. याशिवाय इतरांनाही किरकोळ जखमा झाल्या. सोशल मीडियावर टाकी फुटलेल्या क्षणांचे दृष्य व्हायरल झाले असून चित्रपटाचे इतर सेट्स आणि उपकरणं सुद्धा यामुळे खराब झाली आहेत. या दुर्घटनेच्या वेळेस सिनेमाचे मुख्य अभिनेते निखिल सिद्धार्थ आणि निर्माता-कलाकार राम चरण उपस्थित होते की नाही, यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान या अपघातामुळे शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले असून सध्या सुरक्षित उपाययोजना आणि जखमींच्या उपचारावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. ‘द इंडिया हाऊस’ हा सिनेमा १९०५ च्या काळातील क्रांतिकारक चळवळीवर आधारित असून, निखिल सिद्धार्थ प्रमुख भूमिकेत आहेत. अनुपम खेर, सई मांजरेकर आणि दिग्दर्शक राम वाम्सी कृष्णा यांचा सहभाग असल्याने या सिनेमाविषयी रसिकांच्या खूप अपेक्षा आहेत. तथापि, या दुर्घटनेचा पोलीस तपास करत असून सध्या शूटिंग तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे.