लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? काही महिन्यांपूर्वीच पत्नीने दिलेला मुलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:01 IST2025-09-23T12:00:54+5:302025-09-23T12:01:31+5:30

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घटस्फोट होत असल्याच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. या अभिनेत्याला एक लहान मुलगीही आहे

telugu actor sarvanand divorces after just two years with wife raskhita shetty | लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? काही महिन्यांपूर्वीच पत्नीने दिलेला मुलीला जन्म

लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? काही महिन्यांपूर्वीच पत्नीने दिलेला मुलीला जन्म

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एक प्रसिद्ध अभिनेता त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेत असल्याच्या बातमीने अभिनेत्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. हा अभिनेता आहे सर्वानंद. तमिळ अभिनेता सर्वानंद आणि त्याची पत्नी रक्षिता रेड्डी यांच्या घटस्फोटाची बातमी सध्या चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्यात मतभेद सुरू झाल्याचं बोललं जात आहे. जाणून घ्या सविस्तर

लग्नाच्या २ वर्षानंतर अभिनेता घेणार घटस्फोट

मीडिया रिपोर्टनुसार, सर्वानंद आणि रक्षिता यांच्यात काही वैयक्तिक कारणांवरून वाद सुरू आहेत, ज्यामुळे ते दोघे वेगळे राहत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. २०२३ मध्ये त्यांचं लग्न झाले होतं. लग्नाच्या एक वर्षानंतर दोघेही आई-बाबा झाले असून त्यांना एक मुलगीही झाली. मात्र, तरीही त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. या सर्व चर्चांवर सर्वानंद यांच्या कुटुंबाने स्पष्टीकरण दिलं आहे.


सर्वानंदच्या कुटुंबाच्या मते या बातम्या खोट्या असून, त्यांच्यात कोणताही वाद नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या जवळच्या सूत्रांनी असंही म्हटले आहे की, सर्वानंद यांनी अद्याप घटस्फोटासाठी कोणताही अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची बातमी केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं जात आहे. आता सर्वानंद किंवा रक्षिताने अधिकृत खुलासा केल्यानंतर या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे सर्वांना कळेल. 'कादलना सुम्मा इल्ला', 'एंगेयुम एपोथुम' या सिनेमांमधून सर्वानंदला चांगलीच लोकप्रियता मिळाली. परंतु सर्वानंद आणि रक्षिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी त्यांच्या चाहत्यांना काळजी आहे.

Web Title: telugu actor sarvanand divorces after just two years with wife raskhita shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.