साऊथमधील कलाकारांना बॉलिवूडमध्ये कशी मिळते वागणूक? थलपती विजयच्या सहअभिनेत्रीने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:19 IST2026-05-08T10:11:27+5:302026-05-08T10:19:14+5:30

"तिथे कोणताही आदर दिसून येत नाही...",बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत लोकप्रिय अभिनेत्रीचं धक्कादायक विधान 

tamil actress simran blamed bollywood disrespect and ignore their legacy work with thalapathy vijay | साऊथमधील कलाकारांना बॉलिवूडमध्ये कशी मिळते वागणूक? थलपती विजयच्या सहअभिनेत्रीने केली पोलखोल

साऊथमधील कलाकारांना बॉलिवूडमध्ये कशी मिळते वागणूक? थलपती विजयच्या सहअभिनेत्रीने केली पोलखोल

South Indian Actress Sirman: बॉलिवूड आणि साऊथ सिने इंडस्ट्रीची नेहमीच तुलना केली जाते. टॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय असूनही हिंदी चित्रपटांच्या सेटवर अनेकदा बाजूला सारलं जातं असं आरोप देखील अनेकांनी केले आहेत. अलिकडेच अभिनेता दुलकर सलमानने बॉलिवूडमध्ये काम करताना त्याला आलेले चांगले-वाईट अनुभव शेअर केले होते. त्यानंतर आता दाक्षिणात्य सिनेविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. तिच्या या वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान, या अभिनेत्रीचं नाव म्हणजे सिमरन.   सलमान खानच्या 'टायगर ३' आणि मनोज वाजपेयींसोबत 'गुलमोहर' चित्रपटात झळकलेली तमिळ अभिनेत्र सिमरन हिने नुकतीच फिल्म फेअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत दक्षिणेकडील कलाकारांनी मिळणारी वागूणक तसेच येथील कामाच्या पद्धतीवर भाष्य केलं आहे. त्यासोबतच तिने इंडस्ट्रीपासून अंतर ठेवण्याचं कारणही सांगितलंय.

या मुलाखतीत सिमरन म्हणाली, "मी अनेकदा हिंदी चित्रपट करण्यास नकार दिला आहे, कारण तिथल्या लोकांशी मला जुळवून घेणं कठीण जातं. असं वाटतं की जणू या लोकांनी आमचं काम पाहिलंच नाही. तिथे साऊथ स्टार्सबद्दल कोणताही आदर दिसून येत नाही.  मी माझ्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक आयुष्य सिनेसृष्टीला समर्पित केलं आहे. तरीही जर मला सन्मान मिळत नसेल तर खूप दु:ख होतं." मग ती म्हणाली," काही निर्मिती संस्था तर मूलभूत सुविधा सुद्धा पुरवत नाहीत. राहण्याच्या जागेपासून ते जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वाग घालतात. या गोष्टी मनाला खूप लागतात. "

सनी देओलच्या सिनेमाची केली प्रशंसा

दरम्यान, अभिनेत्री सिमरनने असंही म्हटलंकी इंडस्ट्रीत सर्व प्रोड्यूसर्स तसे नाहीत. तिने सनी देओलच्या आगामी चित्रपट गबरुचे उदाहरण दिले, ज्यात ती दिसणार आहे. अभिनेत्री म्हणाली की त्या चित्रपटाचे निर्माते ओम छंगाणी खूप चांगले गृहस्थ आहेत. एवढेच काय सनी देओल देखील चांगले को-स्टार आहेत. सिमरन हीने मनोज वाजपेयी याचा चित्रपट गुलमोहरमध्ये काम करणं हा देखील एक चांगला अनुभव असल्याचं सांगितलं. 

अभिनेत्री सिमरन हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. आजवर तिने अनेक तेलुगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने थलपती विजयसोबतही स्क्रिन शेअर केली आहे. 

Web Title : बॉलीवुड में दक्षिण के कलाकारों का अनादर: सिमरन का खुलासा

Web Summary : अभिनेत्री सिमरन ने खुलासा किया कि बॉलीवुड में दक्षिण भारतीय कलाकारों को अनादर और अपर्याप्त सुविधाओं का सामना करना पड़ता है। उन्होंने अपने व्यापक करियर के बावजूद, व्यवहार और सम्मान में असमानताओं पर प्रकाश डाला। हालाँकि, उन्होंने सनी देओल और 'गबरू' फिल्म टीम की प्रशंसा की।

Web Title : South stars face disrespect, unequal treatment in Bollywood: Simran reveals

Web Summary : Actress Simran reveals South Indian artists face disrespect and inadequate facilities in Bollywood. She highlighted disparities in treatment and lack of respect, despite her extensive career. However, she praised Sunny Deol and the 'Gabru' film team.