'अरनमनाई ४'चा हिंदी ट्रेलर पाहिलात का? तमन्ना अन् राशीच्या सिनेमात हॉररसोबत कॉमेडीचा तडका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:24 IST2024-05-28T13:03:19+5:302024-05-28T13:24:01+5:30

 'अरनमनाई ४'  या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केलं आहे.

Tamannaah Bhatia and Raashii Khanna's movie aranmanai 4 hindi official trailer release | 'अरनमनाई ४'चा हिंदी ट्रेलर पाहिलात का? तमन्ना अन् राशीच्या सिनेमात हॉररसोबत कॉमेडीचा तडका!

'अरनमनाई ४'चा हिंदी ट्रेलर पाहिलात का? तमन्ना अन् राशीच्या सिनेमात हॉररसोबत कॉमेडीचा तडका!

प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि राशी खन्ना (Raashii Khanna)  स्टारर  'अरनमनाई ४' चित्रपटाने तामिळ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  हा  हॉरर-कॉमेडी सिनेमा हिंदीमध्ये कधी प्रदर्शित होतो, याची  प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात होते. आता तमन्ना आणि राशीच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. हा सिनेमाचा हिंदी भाषेतील ट्रेलरही रिलीज झाला आहे. हा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. जो पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

 'अरनमनाई ४'  या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले असून, आता हा चित्रपट हिंदीत ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.  तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. थरारक अनुभव देणारा दोघींचा अभिनय अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा 'अरनमानाई ४' पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे. 

 'अरनमानाई ४'चं दिग्दर्शन सुंदर सी. यांनी केलं. तर चित्रपटाची निर्मिती खुशबू सुंदर, एसीएस अरुण कुमार, साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे केली आहे. या चित्रपटातील प्रत्येक दृश्याला रोमांचक वातावरणाची किनार जोडण्यात आली आहे. तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.

अरनमनई या फिल्म सीरिजचा पहिला चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हंसिका मोटवानी, विनय राय, सुंदर आणि अँड्रिया जेरेमिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा दुसरा भाग २०१६ मध्ये रिलीज झाला होता. त्यात सुंदर, हंसिका मोटवानी, सिद्धार्थ आणि त्रिशा दिसले. तसेच या चित्रपटाचा तिसरा भाग २०२१ मध्ये रिलीज झाला होता. ज्यामध्ये सुंदर, राशि खन्ना आणि एंड्रिया जेरेमिया यांनी काम केले होते. तर या चित्रपटाचा तामिळ भाषेतील चौथा भाग ३  मे रोजी प्रदर्शित झाला होता. 

Web Title: Tamannaah Bhatia and Raashii Khanna's movie aranmanai 4 hindi official trailer release