'या' सुपरस्टारला करायचं होतं श्रीदेवीसोबत लग्न; मात्र, एका घटनेमुळे बदललं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:49 IST2026-02-13T09:48:45+5:302026-02-13T09:49:46+5:30
Sridevi: त्याकाळी श्रीदेवी यांच्या सौंदर्याची बरीच चर्चा रंगायची. विशेष म्हणजे ब्रेन विथ ब्युटी असलेल्या या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते.

'या' सुपरस्टारला करायचं होतं श्रीदेवीसोबत लग्न; मात्र, एका घटनेमुळे बदललं आयुष्य
श्रीदेवी (sridevi) हे नाव आजही घेतलं तरीदेखील डोळ्यासमोर तिच्या सिनेमांची यादी उभी राहते. दाक्षिणात्य सिनेमांपासून सुरु झालेला तिचा प्रवास बॉलिवूडमध्ये चांगलाच गाजला. श्रीदेवीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर तिने प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे इंडस्ट्रीमध्येही असे अनेक कलाकार होते ज्यांनी श्रीदेवी सोबत लग्न करण्याची इच्छा होती. यामध्येच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत एका सुपरस्टारचाही समावेश होता. मात्र, एका घटनेमुळे या अभिनेत्याने श्रीदेवीसोबत लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकला.
त्याकाळी श्रीदेवी यांच्या सौंदर्याची बरीच चर्चा रंगायची. विशेष म्हणजे ब्रेन विथ ब्युटी असलेल्या या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते. यामध्येच साऊथचा थलायवी अर्थात रजनीकांत (rajinikanth) यांचंही नाव घेतलं जातं. रजनीकांत यांना श्रीदेवीसोबत लग्न करायचं होतं. इतकंच नाही तर तिला प्रपोज करण्यासाठीही ते गेले होते.
श्रीदेवीला प्रपोज करणार होते रजनीकांत
रजनीकांत यांचं श्रीदेवी यांच्यावर प्रेम असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच ते तिला प्रपोज करण्यासाठीही गेले होते. मात्र, एका घटनेमुळे त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. श्रीदेवी यांच्या नवीन घरी गृहप्रवेश होता त्याच दिवशी रजनीकांत यांनी प्रपोज करायचा करणार होते.
'या' घटनेमुळे रजनीकांत यांनी बदलला निर्णय
श्रीदेवी यांच्या नवीन घरी गृहप्रवेश असल्यामुळे रजनीकांत शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. मात्र, ज्याक्षणी त्यांनी घरात पाऊल टाकलं त्याचवेळी घरातील लाईट गेले. ज्यामुळे रजनीकांत प्रचंड धास्तावले. आपलं पाऊल पडणं आणि लाईट जाणं याचा काही तरी संबंध आहे आणि तो अपशकून आहे असं त्यांना वाटलं. ज्यामुळे पुन्हा अपशकुन घडायला नको असा विचार करुन त्यांनी श्रीदेवी यांना प्रपोज न करताच ते स्वगृही परतले.
दरम्यान, रजनीकांत यांनी १९८१ मध्ये लता रंगाचारी यांच्याशी लग्न केलं. तर श्रीदेवी यांनी १९९६ मध्ये बोनी कपूरसोबत लग्नगाठ बांधली. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवीचं अकस्मात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला प्रचंड मोठा धक्का बसला.