'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 12:18 IST2024-01-16T12:17:14+5:302024-01-16T12:18:01+5:30

कतरिना आणि विजय सेतुपतिच्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमाकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होती.

south movie Hanuman collects more than katrina kaif s movie Merry Christmas | 'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे

'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे

कतरिना कैफचा (Katrina Kaif) 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा सिनेमा मागच्या आठवड्यात रिलीज झाला. या सिनेमात कतरिनासोबत साऊथ स्टार विजय सेतुपतिची जोडी आहे. श्रीराम राघवन यांच्या टिपीकल रहस्यमय सिनेमावर याही सिनेमाची कहाणी आधारित आहे. प्रेक्षकांना सिनेमा आवडला असला तरी एका साऊथ सिनेमाने कलेक्शनमध्ये 'मेरी ख्रिसमस'ला मागे टाकलं आहे. साऊथ अभिनेता तेजा सज्जाचा 'हनुमान' (Hanuman) सिनेमाला प्रेक्षकांचा जास्त प्रतिसाद मिळतोय.

कतरिना आणि विजय सेतुपतिच्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमाकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होती. मात्र सिनेमाचं कलेक्शन हळहळू कमीच होताना दिसतंय. Sacnilk रिपोर्टनुसार, चौथ्या दिवशी सिनेमाने जवळपास 1.65 कोटींचा व्यवसाय केला. आधीच्या दिवसांचं बघायचं तर पहिल्या दिवशी 2.45 कोटी, दुसऱ्या दिवशी 3.45 कोटी आणि तिसऱ्या दिवशी सिनेमाने 3.83 कोटी रुपये कमावले. सिनेमाचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन 11.38 कोटी रुपये आहे. 

साऊथ अभिनेता तेजा सज्जाचा 'हनुमान' सिनेमा बॉक्सऑफिसवरील कमाईत 'मेरी ख्रिसमस'च्याही पुढे आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने 8.05 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी 12.45 कोटी, तिसऱ्या दिवशी 16 कोटी आणि चौथ्या दिवशी तब्बल 14.50 कोटींचा धंदा केला. म्हणजेच सिनेमाने केवळ चारच दिवसात एकूण 55.15 कोटी रुपये कमावले. 

'हनुमान' ही एक सुपरहिरो फिल्म आहे. प्रशांत वर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये तेजा सज्जा, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, विनय राय, राज दीपक शेट्टी यांच्या भूमिका आहेत. सोशल मीडियावरही सिनेमाची जोरदार चर्चा आहे. फक्त 20 कोटीचं बजेट असलेल्या सिनेमाने चारच दिवसात पैसा वसूल केला आहे. 

Web Title: south movie Hanuman collects more than katrina kaif s movie Merry Christmas