६० कोटींचं बजेट, १२५ दिवस चाललं शूटिंग; बॉलिवूडवर भारी पडतोय 'हा' ॲक्शनपट, तुम्ही पाहिलात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:32 IST2025-09-17T13:21:16+5:302025-09-17T13:32:19+5:30

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील रायजिंग स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजा सज्जाची सध्या सगळीकडे चर्चा आहे

south actor teja sajja and shriya saran starrer mirai movie get positive response from audience know about collection | ६० कोटींचं बजेट, १२५ दिवस चाललं शूटिंग; बॉलिवूडवर भारी पडतोय 'हा' ॲक्शनपट, तुम्ही पाहिलात?

६० कोटींचं बजेट, १२५ दिवस चाललं शूटिंग; बॉलिवूडवर भारी पडतोय 'हा' ॲक्शनपट, तुम्ही पाहिलात?

Mirai Cinema: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील रायजिंग स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजा सज्जाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. 'मिराई' या त्याच्या चित्रपटाने सिनेमींची मनं जिंकली आहेत.प्रदर्शनानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे.हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.हा पॅन इंडिया चित्रपट आहे, जो हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह अनेक भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. 

'मिराई' हा अॅक्शनपट हा पौराणिक कथेवर आधारित आहे.चित्रपटाचं संपूर्ण कथानक वेदाच्या पात्राभोवती फिरतं. चित्रपटात एक सर्वसामान्य माणूस ते योद्धा बनण्याचा त्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. २ तास ४९ मिनिटांचा हा चित्रपट कार्तिक गट्टमनेनी यांनी दिग्दर्शित केला आहे.या कथेची सुरुवात सम्राट अशोकाच्या काळापासून सुरू होते. 
अंबिका (श्रिया सरन) ही या ग्रंथांची रक्षक आहे आणि नवव्या ग्रंथाचे, मिराईचे रक्षण करण्यासाठी तो आपलं आयुष्य पणाला लावतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. रिलीजच्या पहिल्या चार दिवसांत, मिराईने भारतात ५६.७५ कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

६० कोटी बजेट...

जवळपास १२५ दिवस शूटिंग आणि ६० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर जम बसवला असून  हा चित्रपट टायगर श्रॉफच्या बागी-४ ला टक्कर देताना दिसतोय.या बहुचर्चित चित्रपटात तेजा सज्जासह श्रिया सरण, मंचू मनोज, जगपती बाबू,  रितिका नायक आणि जयराम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: south actor teja sajja and shriya saran starrer mirai movie get positive response from audience know about collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.