"मला धक्काच बसला...", सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:27 IST2025-01-16T15:22:54+5:302025-01-16T15:27:05+5:30
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर एका अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.

"मला धक्काच बसला...", सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरची प्रतिक्रिया
South Actor Junior NTR Reaction:बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी (१५ जानेवारी) ला रात्री चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. वांद्रे पश्चिम येथील त्याच्या राहत्या घरामध्ये घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला करत चाकूने शरीरावर सहा ठिकाणी वार केले. त्यानंतर तातडीने अभिनेत्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. सैफ अली खानवर झालेल्या या भयावह हल्ल्यामुळे मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही आता व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच दाक्षिणात्य अभिनेता जुनिअर एनटीआरने या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिल्याची पाहायला मिळतेय.
Shocked and saddened to hear about the attack on Saif sir.
— Jr NTR (@tarak9999) January 16, 2025
Wishing and praying for his speedy recovery and good health.
साउथ सुपरस्टार अभिनेता जुनिअर एनटीआरने सैफ अली खानवर झालेल्या हल्लावर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच जुनिअर एनटीआरने आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, "मला धक्काच बसला आणि वाईट वाटतंय. सैफ अली खान लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आहे."
दरम्यान, साउथ सुपरस्टार जुनिअर एनटीआर आणि सैफ अली खानने अलिकडेच 'देवरा' या सिनेमात एकत्रित स्क्रीन शेअर केली होती. 'देवरा'मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर सुद्धा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.