'इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांची हीच अवस्था'; लव्ह लाइफविषयी श्रृती हासनचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 10:11 IST2026-03-23T10:10:27+5:302026-03-23T10:11:10+5:30
Shruti haasan: श्रुती अनेकदा तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे.

'इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांची हीच अवस्था'; लव्ह लाइफविषयी श्रृती हासनचा खुलासा
कलाविश्वात कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्याचीही कायम चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांची लव्ह लाइफ सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत असते. दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हासन (Shruti haasan) बऱ्याचदा तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत आली आहे. आतापर्यंत तिचं नाव अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं आहे. या सगळ्यावर अलिकडेच तिने प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर प्रेम प्रकरण हे इंडस्ट्रीसाठी नवीन नाही. आणि, इथे सगळ्यांची अशीच अवस्था आहे, असंही तिने यावेळी म्हटलं आहे.
अलिकडेच श्रुतीने 'मॅशेबल इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला तिच्या लव्ह लाइफविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. 'प्रेमात वारंवार अपयश का येत?' असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर, तिने तिचं मत मांडलं.
प्रेमाविषयी काय म्हणाली श्रुती?
''माझी लव्ह लाइफ Long Distance ची असते. कधी गाण्याचं चित्रीकरण असतं. तर कधी सिनेमाचं. यातून जेव्हा कधी ब्रेक मिळतो त्यावेळी समोरच्या व्यक्तीला त्याचं वैयक्तिक आयुष्य जगायचं असतं. हे बघा, खरं पाहायला गेलं तर इंडस्ट्रीत जवळपास सगळ्याची हिच अवस्था आहे,'' असं श्रुती म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''ज्यावेळी मी एखाद्याच्या प्रेमात पडते त्यावेळी एकदम टिपिकल संस्कारी मुलगी होते. मी माझ्या पार्टनरला प्रेमाने जेवण भरवते. त्याच्यावर मनापासून प्रेम करते. जर त्याला ताप आला असेल तर त्याची खूप काळजी घेते. पण, मी हे त्याच्याचसाठी करते ज्याला माझ्या या भावनांची किंमत आहे. आदर आहे.''
श्रुतीने या मुलाखतीमध्ये ती कोणाला डेट करते या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र टाळलं. परंतु, जर कोणाला डेट करायची वेळ आली तर तेलुगू मुलाला डेट करेन असं ती म्हणाली. तेलुगू मला नीट बोलता येत नाही. त्यामुळे जर तेलुगू मुलाला डेट केलं तर माझी भाषा नक्कीच सुधारेल असं ती यावेळी म्हणाली. दरम्यान, मागच्या वर्षी श्रुती 'कुली' या सिनेमात झळकली होती. त्यानंतर आता ती 'ट्रेन', 'सालार 2' या सिनेमात झळकणार आहे.