खरं की काय? अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा-३' मध्ये सलमान घेणार एन्ट्री! सोशल मीडियावर चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:54 IST2026-01-21T12:42:39+5:302026-01-21T12:54:25+5:30
अल्लू अर्जुनला टक्कर देणार बॉलिवूडचा दबंग खान, 'पुष्पा-३'बाबत आली मोठी अपडेट

खरं की काय? अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा-३' मध्ये सलमान घेणार एन्ट्री! सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Allu Arjun Pushpa 3 Update: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना स्टार पुष्पा- द राइज, पुष्पा-द रुल या दोन्ही चित्रपटांनी ब़ॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटांनी देशातचं नाहीतर जगभरातील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. सुकुमार यांच्या या फ्रॅंचाईझीचा चाहतावर्ग फार मोठा आहे. अशातच आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे सिनेरसिकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा ३: द रॅम्पेज’ चित्रपट तीन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात आता या फ्रेंचायझीमध्ये बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खानची एन्ट्री होणार असल्याची माहिती मिळते आहे. सलमान खान मिथ्री मूव्ही मेकर्ससोबत काम करणार असल्याच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत आहेत.
अलिकडेच, या प्रॉडक्शन कंपनीचे मालक नवीन येर्नेनी यांनी सलमान खानसोबतचा एक फोटो पोस्ट केला, ज्यामुळे या अफवांनी आणखी जोर धरला.
'पुष्पा-द रुल' मध्ये अभिनेता फहाद फॉसिलने साकारलेला खलनायक चांगला गाजला होता. मात्र, या दुसऱ्या पार्टमध्येच या पात्राचा शेवट दाखवण्यात आला आहे. त्यानंतर तेव्हापासून, तिसऱ्या भागात विजय देवरकोंडा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे तर्कवितर्क लावण्यात आले होते. मात्र, आता सलमान खान विजयचा पत्ता कट करणार असल्याचं बोललं जातंय.'पुष्पा ३' मध्ये सलमान एक कॅमिओ असणार आहे. ज्यात त्याच्या पात्राचं नाव सुल्तान असल्याचंही कळतंय. परंतु, या चर्चांवर सलमान किंवा 'पुष्पा ३: द रॅम्पेज’ सिनेमाच्या निर्मात्यांची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मिडिया रिपोर्टनुसार, निर्माते 'पुष्पा ३: द रॅम्पेज’ मध्ये सलमानच्या एन्ट्रीबद्दल प्लॅनिंग करत आहेत. तिसऱ्या भागात या चित्रपटात सलमान खान एक करोडपती, धूर्त आणि व्यावसायिक उद्योजकाची भूमिका साकारताना दिसू शकतो, जे एक नकारात्मक पात्र आहे.