एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 10:38 IST2025-12-22T10:37:35+5:302025-12-22T10:38:21+5:30
प्रियंका चोप्रा नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये आली होती. तिथे तिने सिनेमाच्या बजेटवर भाष्य केलं.

एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
एस एस राजामौली यांच्या आगामी 'वाराणसी' सिनेमाची चर्चा आहे. सिनेमात महेश बाबू, पृथ्वीराज सुकुमारन आणि प्रियंका चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट आहे. 'बाहुबली', 'RRR'च्या यशानंतर आता राजामौलींच्या या सिनेमाकडे सर्वांचं लक्ष आहे. तसंच 'देसी गर्ल'प्रियंका चोप्राला सिनेमात घेतल्याने याची चर्चा आणखी वाढली आहे. सिनेमाचं बजेटच तब्बल १३०० कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. यावर नुकतंच प्रियंका चोप्राने उत्तर दिलं आहे.
एस एस राजामौलींच्या पॅन इंडिया सिनेमाचं काही दिवसांपूर्वीच टायटल घोषित झालं. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे पार पडलेल्या भव्य इव्हेंटमध्ये सिनेमाचं नाव 'वाराणसी' जाहीर करण्यात आलं. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. महेशबाबूची फर्स्ट लूकही रिव्हील करण्यात आला. आता सिनेमाच्या बजेवरुन चर्चा सुरु आहे. मेकर्सने अद्याप बजेटबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. दरम्यान प्रियंका चोप्रा नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये आली होती. तिथे तिने सिनेमाच्या बजेटवर भाष्य केलं.
शोमध्ये कपिल म्हणाला,'सगळ्यांनाच माहित आहे की प्रियंका कोणतंही छोटं काम करत नाही. सगळं काही लार्जन दॅन लाईफ गोष्टी करते. आता ती राजामौलींचा सिनेमा करत आहे. राजामौलींचा सिनेमा म्हटलं की तो बिग बजेटच असणार. आता यात प्रियंका चोप्राने आली आहे तर या सिनेमाचं बजेट १३०० कोटी झालं असल्याचं आम्ही ऐकलं.' यावर प्रियंका हसतच 'हो' म्हणाली. कपिलने पुढे विचारलं, 'तर या १३०० कोटींमध्ये फक्त सिनेमा बनणार की वाराणसीतील लोकांना नोकऱ्याही देणार? आधी म्हणत होते की बजेट नव्हतं. पण जेव्हापासून तुझी एन्ट्री झाली आहे बजेट वाढलंय. हे खरंय का? तुझ्याकडूनच कन्फर्म करतो.' यावर प्रियंका म्हणाली, 'तू काय बोलण्याचा प्रयत्न करतोय की अर्धं बजेट माझ्या बँक अकाऊंटमध्ये गेलं?' कपिल म्हणतो, 'अर्थ तर हाच निघतो'. कपिलने प्रियंकाची अशा प्रकारे चेष्टा केल्यावर एकच हशा पिकला.
मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी प्रियंका चोप्राला ३० कोटी रुपये मानधन मिळालं आहे. जर हे खरं असेल तर ती सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरेल.