तरुण मुलींचं अपहरण अन् शोधमोहिमेचा थरार! २ तास ५० मिनिटांचा 'हा' थ्रिलर सिनेमा पाहून उडेल झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:06 IST2025-09-16T13:01:28+5:302025-09-16T13:06:01+5:30
२ तास ५० मिनिटांचा 'हा'थ्रिलर सिनेमा पाहून उडेल झोप, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग

तरुण मुलींचं अपहरण अन् शोधमोहिमेचा थरार! २ तास ५० मिनिटांचा 'हा' थ्रिलर सिनेमा पाहून उडेल झोप
OTT Trending Movie: अलिकडच्या काळात ओटीटीवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. दर आठवड्याला ओटीटीवर काय रिलीज होणार हे पाहण्यासाठी सिनेप्रेंमींना उत्सुकता असते. त्यात अॅक्शन, थ्रिलर, सन्पेन्स चित्रपटांना सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. अशाच एका चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या चित्रपटाला आयएमडीवर खूप चांगली रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपटाती ट्विस्ट आणि कथानकातील रंजक वळण पाहून प्रेक्षक थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. जवळपास २ तास ५० मिनिटांच्या या चित्रपटाचं नाव रत्सासन आहे.
'रत्सासन' या साऊथ थ्रिलर सिनेमात एका सिरिअल किलरची कथा दाखवण्यात आली आहे. हा किलर तरुण मुलींचं अपहरण करुन त्यांची निर्घण पद्धतीने हत्या करतो. दिवसेंदिवस या घटना वाढू लागल्याने याचा तपास करण्यासाठी एसआय अरुण कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात येते. चित्रपटात प्रत्येक वळणावर सस्पेन्स पाहायला मिळतो. हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.
या चित्रपटात अभिनेता विष्णू विशालसह अमला पॉल, सरवनन आणि अॅनाबेला जॉर्ज हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा २ तास ५० मिनिटांचा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. बॉलिवूडचा कठपुतली हा सिनेमा याचाच रिमेक असल्याचं म्हटलं जातं.