"आई, इकडे या ना!"; रश्मिका मंदानाचं सासूबाईंसोबतचं गोड नातं पाहून चाहते सुखावले, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:57 IST2026-03-20T17:54:20+5:302026-03-20T17:57:59+5:30

एका पुरस्कार सोहळ्यासाठी रश्मिका तिच्या सासूबाईंसह उपस्थित होती. त्यावेळी रश्मिकाचं सासूबाईंसोबतचं खास नातं पाहून चाहत्यांना आनंद झाला.

Rashmika Mandanna's fans were happy to see her sweet relationship with her mother-in-law | "आई, इकडे या ना!"; रश्मिका मंदानाचं सासूबाईंसोबतचं गोड नातं पाहून चाहते सुखावले, व्हिडीओ व्हायरल

"आई, इकडे या ना!"; रश्मिका मंदानाचं सासूबाईंसोबतचं गोड नातं पाहून चाहते सुखावले, व्हिडीओ व्हायरल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या तेलंगणा राज्य 'गदर अवॉर्ड्स'मध्ये रश्मिकाला 'द गर्लफ्रेंड' (The Girlfriend) या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी रश्मिका तिच्या सासूबाईंसह उपस्थित होती. त्यावेळी रश्मिकाचं सासूबाईंसोबतचं खास नातं पाहून चाहत्यांना आनंद झाला.

'गदर अवॉर्ड्स' पुरस्कार सोहळ्यात रश्मिका तिच्या सासूबाईंसह उपस्थित होती. रश्मिका सासूबाईंसोबत रेड कार्पेटवर आली. तेव्हा उपस्थित फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर रश्मिकाला फोटो काढण्यासाठी थांबवत होती. त्यामुळे सासूबाई पुढे निघून गेल्या. त्यावेळी रश्मिकाने क्षणाचाही वेळ न दवडता ''आई, इकडे या ना!'' अशी सासूबाईंना हाक मारली. पुढे रश्मिकाने सोलो फोटो न काढता सासूबाईंसोबत फोटोशूट केलं. सासूबाई समोरचा झगमगाट पाहून काहीशा अवघडलेल्या दिसत असल्या तरीही रश्मिकाने त्यांचा हात हातात घेऊन प्रेमाने फोटो काढले.


याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रश्मिकाने मंचावरून आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, "एक काळ असा होता जेव्हा माझ्या अभिनयासाठी मला प्रचंड ट्रोल केले गेले होते. मात्र, आज मला माझ्या अभिनयासाठी राज्याचा पुरस्कार मिळत आहे. हा प्रवास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 'द गर्लफ्रेंड' सारख्या चित्रपटासाठी हा सन्मान मिळणे खूप खास आहे." रश्मिकाचे हे शब्द ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या तिच्या सासूबाई भावुक झाल्या. त्यांनीही टाळ्या वाजवून रश्मिकाचं कौतुक केलं.

कार्यक्रमाची सूत्रसंचालक सुमा हिने रश्मिकाचा उल्लेख 'विजय देवरकोंडाची पत्नी' असा केला आणि लग्नानंतर रश्मिका तिचा पहिलाच उगादी (पाडवा) सण साजरा करत आहे याशिवाय लग्नानंतर रश्मिकाचा पहिला पुरस्कार असल्याचे सांगितले. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीही रश्मिका ही त्यांच्या गावची सून असल्याचे आवर्जून सांगितले.

विजय आणि रश्मिकाचा विवाह

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये साखरपुडा केला होता आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये उदयपूरमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा पार पडला. रश्मिका आणि विजयने 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. सात वर्षांनंतर ही जोडी आता 'रणबली' या चित्रपटात पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title : रश्मिका मंदाना का अपनी सास के साथ प्यारा बंधन, प्रशंसक खुश।

Web Summary : रश्मिका मंदाना का एक पुरस्कार समारोह में अपनी सास के साथ स्नेहपूर्ण व्यवहार ने प्रशंसकों को मंत्रमुग्ध कर दिया। उन्होंने अपनी सास को 'आई' कहकर फोटो के लिए बुलाया, बाद में, उन्होंने अपना पुरस्कार उन्हें समर्पित कर दिया, जिससे उनकी सास भावुक हो गईं। विजय देवरकोंडा के साथ उनकी शादी की भी खबर है।

Web Title : Rashmika Mandanna's sweet bond with her mother-in-law delights fans.

Web Summary : Rashmika Mandanna's heartwarming interaction with her mother-in-law at an awards show charmed fans. She called her 'Aai' for photos, later, she dedicated her award to her, making her mother-in-law emotional. News also reports of her marriage to Vijay Deverakonda.