"लग्नानंतर आम्ही आता..."; रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने घेतला 'हा' निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:39 IST2026-03-25T15:34:40+5:302026-03-25T15:39:49+5:30
रश्मिका-विजयच्या लग्नाला बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीतील लोकांनी हजेरी लावली. आता लग्नानंतर रश्मिका-विजयने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

"लग्नानंतर आम्ही आता..."; रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने घेतला 'हा' निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. इतकंच नव्हे दोघांच्या लग्नाच्या पारंपरिक फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला. लग्नानंतर रश्मिका-विजय या दोघांनी जवळच्या लोकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवली. यावेळी बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीतील लोकांनी हजेरी लावली. आता लग्नानंतर रश्मिका-विजयने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
विजय-रश्मिकाने घेतला हा निर्णय
रश्मिका-विजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात, ''लग्नाच्या गडबडीनंतर, आम्हाला काही दिवस निवांत घालवायचे होते. शांत सकाळ, दुपारच्या वेळी पोहण्याचा आनंद आणि संध्याकाळी टेबल टेनिस, पूल गेम्स आणि रात्रभर चालणाऱ्या गप्पा-गोष्टींसोबत चित्रपट पाहण्यात आम्ही व्यस्त होतो. कोह सामुईमधील ही जागा आम्हाला अगदी घरच्यासारखी वाटली. यावेळी हे घर आमचे मित्र आणि मनमुराद हास्याने भरुन गेलं होतं... त्या दिवसांतील काही खास आठवणी.''
अशा शब्दांत रश्मिका-विजयने खुलासा केला. एकूणच लग्नाच्या धामधुमीतून निवांत वेळ घालवण्यासाठी रश्मिका-विजयने थायलंड येथील कोह सामुई या बेटावर जाण्याचा निर्णय घेतला. या दोघांसोबत त्यांचे जवळचे मित्रही उपस्थित होते. दोघांनी खास व्हिडीओ शेअर करुन ही गोष्ट चाहत्यांना सांगितली. रश्मिका-विजयने घेतलेल्या या निर्णयाचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. एकूणच लग्नाच्या धामधुमीतून ब्रेक घेण्याची गरज प्रत्येकाला असते. त्यामुळे रश्मिका-विजयने लग्न-रिसेप्शननंतर एकमेकांसाठी काढलेला हा वेळ नक्कीच खास आहे.