रक्तबंबाळ चेहरा अन् नजरेत अंगार! अभिनेत्रीचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार, तुम्ही ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:40 IST2025-06-27T12:38:49+5:302025-06-27T12:40:56+5:30

भारतीय मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. ही अभिनेत्री आजवर कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसत आहे

rashmika mandanna upcoming movie mysaa announcement pan india film | रक्तबंबाळ चेहरा अन् नजरेत अंगार! अभिनेत्रीचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार, तुम्ही ओळखलं?

रक्तबंबाळ चेहरा अन् नजरेत अंगार! अभिनेत्रीचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार, तुम्ही ओळखलं?

सध्या भारतीय मनोरंजन विश्वात विविध सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच नुकतंच एका सिनेमाची अधिकृत घोषणा झाली आहे. या सिनेमाचं नाव आहे 'मैसा'. रक्तबंबाळ चेहरा, हातात हत्यार आणि डोळ्यात अंगार असलेल्या या अभिनेत्रीचा लूक चांगलाच व्हायरल झाला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे रश्मिका मंदाना. 'पुष्पा २'नंतर रश्मिकाचा हा बिग बजेट पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. जाणून घ्या या सिनेमाबद्दल

रश्मिकाचा नवा सिनेमा

अनफॉर्मूला फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या सिनेमात एका स्त्री योद्धीची हिम्मत, धैर्य आणि लढ्याची कहाणी उलगडली जाणार आहे. रश्मिकाचा आतापर्यंत कधीही न पाहिलेला अवतार, असंच हा पोस्टर पाहून वाटतंय.

 रश्मिका स्वतः या प्रोजेक्टबद्दल खूपच उत्साहित दिसतेय. तिनं सिनेमाचं टायटल आणि लूक सोशल मीडियावर शेअर करत एक खास कॅप्शन लिहिलं: "मी नेहमीच तुम्हाला काहीतरी नवीन... काहीतरी वेगळं... आणि काहीतरी थरारक देण्याचा प्रयत्न करते...आणि हा अगदी तसाच एक प्रोजेक्ट आहे... एक असं पात्र जे मी कधीही साकारलं नव्हतं... एक अशी दुनिया जिथे मी कधी गेली नव्हते... आणि माझं असं रूप जे मीसुद्धा कधी पाहिलं नव्हतं... आणि ही तर फक्त सुरुवात आहे..." अशा शब्दात रश्मिकाने तिच्या नवीन प्रोजेक्टविषयी उत्सुकता दर्शवली आहे.


'मैसा' हा सिनेमा एक जबरदस्त भावनिक अ‍ॅक्शन कथा असणार आहे, जी आपल्याला गोंड आदिवासींच्या अनोख्या आणि आजवर न पाहिलेल्या जगात घेऊन जाते. या सिनेमाची रिलीज डेट अजून समोर आली नाहीये. याशिवाय रश्मिकाकडे आगामी काळात अनेक दमदार प्रोजेक्ट्स आहेत. ती लवकरच आयुष्मान खुरानासोबत मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी ‘थामा’मध्ये दिसणार आहे. तसेच चाहत्यांच्या अत्यंत प्रतीक्षेत असलेल्या ‘पुष्पा 3’मध्येही ती तिच्या आयकॉनिक श्रीवल्लीच्या भूमिकेत परतणार आहे. 

Web Title: rashmika mandanna upcoming movie mysaa announcement pan india film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.