रामचरणच्या पत्नीची संपत्ती माहितीये का? दिग्गज उद्योजकाची आहे नात; सांभाळते कोट्यवधींचा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:44 IST2024-05-28T15:43:34+5:302024-05-28T15:44:04+5:30
तिला वारसाहक्काने कोटींची प्रॉपर्टी मिळाली असून ती आजही माहेरचा बिझनेस सांभाळत आहे.

रामचरणच्या पत्नीची संपत्ती माहितीये का? दिग्गज उद्योजकाची आहे नात; सांभाळते कोट्यवधींचा व्यवसाय
दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण तेजा (Ramcharan Teja) RRR सिनेमामुळे ग्लोबल स्तरावर लोकप्रिय झाला. राजामौलींच्या या सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले. रामचरण तेजा दिसायला हँडसम अभिनेता. पण त्याची पत्नीही काही कमी नाही. उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) मोठी उद्योजिका आहे. तिला वारसाहक्काने कोटींची प्रॉपर्टी मिळाली असून ती कुटुंबाचा बिझनेस सांभाळत आहे. उपासनाचं नेटवर्थ किती माहितीये का?
उपासना उद्योजक कुटुंबातून येते. अपोलो हॉस्पिटल्सचं नाव तर सर्वच ऐकून असतील. प्रत्येक शहरात अपोलो वैद्यकीय सेवा देत आहे. डॉ प्रताप सी रेड्डी यांनी अपोलो हॉस्पिटल्सची स्थापना केली आणि शहराशहरात याची चेन सुरु केली. प्रताप रेड्डी 91 वर्षांचे असून ते या संस्थेचे चेअरमन म्हणून आजही काम पाहत आहेत. तर उपासना ही त्यांची नात आहे. तिची आई शोभना या सुद्धा बिझनेस सांभाळतात. उपासना CSR विभागाची जबाबदारी पार पाडते. UR.life या वेलनेस प्रोग्रॅममध्ये उपासनाने महत्वाची भूमिका बजावली होती. तर तिच्या वडिलांनी KEI ग्रुप लाँच केला. उपासना सध्या 77 हजार कोटींचा व्यवसाय सांभाळत आहे.
उपासना आणि रामचरण यांची एकूण संपत्ती 2500 कोटी आहे. उपासना एकटी 1130 कोटींची मालकीण आहे. आलिशान गाड्यांचा यात समावेश आहे. दोघंही अतिशय रॉयल आयुष्य जगतात. शिवाय आता त्यांच्या जीवनात एका चिमुकलीचं आगमन झालं आहे.