'पुष्पा-२' मधील 'डान्सिंग क्वीन'ला पडली तांबडी चामडी गाण्याची भुरळ; पाहा 'श्रीलीला'चा मजेशीर VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:36 IST2024-12-13T13:34:27+5:302024-12-13T13:36:59+5:30
सध्या मनोरंजनविश्वात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बिग बजेट असलेला सिनेमा 'पुष्पा-२:द रुल' ची जोरदार चर्चा सुरू आहे.

'पुष्पा-२' मधील 'डान्सिंग क्वीन'ला पडली तांबडी चामडी गाण्याची भुरळ; पाहा 'श्रीलीला'चा मजेशीर VIDEO
Sreeleela Video: सध्या मनोरंजनविश्वात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बिग बजेट असलेला सिनेमा 'पुष्पा-२:द रुल' ची जोरदार चर्चा सुरू आहे. ५ डिसेंबर २०२४ या दिवशी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाच्या तारखेपासून आजतागायत या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 'पुष्पा' सिनेमाच्या पहिल्या भागामध्ये समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)'उं अंटवा' आयटम सॉंग करून प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यानंतर आता 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2 The Rule) मध्ये अभिनेत्री श्रीलीलाने (Sreeleela) आयटम सॉंग 'किसिक' करून लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिला प्रेक्षकांकडून वाहवा मिळते आहे. त्यामुळे सगळीकडे श्रीलीलाची चर्चा रंगली आहे.
नुकताच सोशल मीडियावर 'डान्सिंग क्वीन' श्रीलीलाने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तांबडी चांबडी गाणं गाताना दिसते आहे. श्रीलीलाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. शिवाय व्हिडीओमध्ये तिचा मजेशीर अंदाज पाहायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेल्या गाण्याची आता श्रीलीलाही भुरळ पडली आहे. "Why talk when you can laka laka laka laka..." असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. तिच्या या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रीलीला एक उत्कृष्ट डान्सर आहे. 'पुष्पा २' मधील आयटम सॉंगमुळे ती प्रसिद्धीझोतात आहे. परंतु यापूर्वी श्रीलीलाने 'गुंटूर करम' चित्रपटातील ‘कुरिची मदाथापेटी’ गाण्यात महेश बाबूबरोबर धमाकेदार डान्समुळे तिची सर्वत्र चर्चा झाली होती. या गाण्यातील तिच्या या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. शिवाय टॉलिवूडमधील 'धमाका' चित्रपटातील 'पल्सर बाईक' आणि 'जिंथाक' या गाण्यांमध्ये तिने आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली.