अल्लू अर्जुन पेक्षा किती वर्षांनी लहान आहे रश्मिका मंदान्ना? वयातील अंतर जाणून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:01 IST2024-12-13T14:58:52+5:302024-12-13T15:01:54+5:30

अल्लू अर्जून हा रश्मिकापेक्षा नक्की किती मोठा आहे माहितीये का?

Pushpa 2 Actor Allu Arjun Rashmika Mandanna Age Difference | अल्लू अर्जुन पेक्षा किती वर्षांनी लहान आहे रश्मिका मंदान्ना? वयातील अंतर जाणून व्हाल हैराण!

अल्लू अर्जुन पेक्षा किती वर्षांनी लहान आहे रश्मिका मंदान्ना? वयातील अंतर जाणून व्हाल हैराण!

 Allu Arjun Rashmika Mandanna Age Difference :'नॅशनल क्रश', 'श्रीवल्ली' अशा नावांनी चर्चेत असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जून हे 'पुष्पा 2' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या जोडीला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आहे.  सिनेमात दोघांचा रोमान्सदेखील पाहायला मिळाला. रश्मिकानं आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स सीन्स दिले आहेत. अल्लू अर्जून हा रश्मिकापेक्षा नक्की किती मोठा आहे माहितीये का?

'पुष्पराज'च्या भुमिकेत असलेला अल्लू अर्जून आणि 'श्रीवल्ली'च्या भूमिकेत असलेल्या रश्मिका मंदान्नाच्या वयात मोठं अंतर आहे.  रश्मिका अल्लू अर्जुनपेक्षा खूपच लहान आहे. अल्लू 41 वर्षांचा आहे, तर रश्मिका ही 28 वर्षांची आहे.  या दोघांच्या वयात 13 वर्षांचा फरक आहे. रश्मिका ही साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे 45 कोटी आहे. 

वयानं मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करणारी रश्मिका ही पहिली अभिनेत्री नाही. अनेक अभिनेत्रींनी आपल्या वयाच्या दुप्पट मोठा असलेल्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स केलाय. दरम्यान, अल्लू अर्जून आणि रश्मिकाच्या  'पुष्पा 2' ने एकाच आठवड्यात जगभरात तगडी कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शन 1060 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 

Web Title: Pushpa 2 Actor Allu Arjun Rashmika Mandanna Age Difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.