पंतप्रधान मोदींनी विजय-रश्मिकासाठी खास पत्र लिहून दिल्या शुभेच्छा, म्हणाले- "सखा सप्तपदा भव..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:08 IST2026-02-25T14:04:52+5:302026-02-25T14:08:35+5:30

सध्या मनोरंजन विश्वात एका जोडीच्या लगीनघाईची चांगलीच चर्चा आहे. ही जोडी म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. हे दोघे पुढील काही तासांत राजस्थानमधील उदयपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत.

Prime Minister narendra Modi wrote a special letter to Vijay Rashmika wedding | पंतप्रधान मोदींनी विजय-रश्मिकासाठी खास पत्र लिहून दिल्या शुभेच्छा, म्हणाले- "सखा सप्तपदा भव..."

पंतप्रधान मोदींनी विजय-रश्मिकासाठी खास पत्र लिहून दिल्या शुभेच्छा, म्हणाले- "सखा सप्तपदा भव..."

सध्या मनोरंजन विश्वात एका जोडीच्या लगीनघाईची चांगलीच चर्चा आहे. ही जोडी म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. हे दोघे पुढील काही तासांत राजस्थानमधील उदयपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या या शाही विवाह सोहळ्याची चर्चा केवळ मनोरंजन विश्वातच नाही, तर राजकीय वर्तुळातही रंगली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या जोडीला पत्र पाठवून त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांचे खास पत्र

पंतप्रधान मोदींनी विजय आणि रश्मिकाला उद्देशून एक भावुक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी या नवविवाहित जोडीला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी या पत्रात सुरुवातीला लग्नाचं आमंत्रण दिल्यानिमित्त दोन्ही कुटुंबाचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी लिहितात, "विजय आणि रश्मिका यांना चित्रपटांच्या कथांची आधीपासूनच ओळख आहे, परंतु त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाची ही गोष्ट सिनेमातील जादूपेक्षाही अधिक विशेष असेल. कारण ही गोष्ट खुद्द देवाने लिहिली आहे."

याशिवाय 'सखा सप्तपदा भव' असं लिहित येणारे दिवस, महिने आणि वर्षे या दोघांच्याही आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवोत, अशी सदिच्छाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. उद्या अर्थात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये शाही थाटात रश्मिका आणि विजय एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. सिनेमात एकमेकांसोबत काम करणारे हे दोघे आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे आयुष्यभराचे साथीदार बनणार आहेत. रश्मिका आणि विजयच्या लग्नाची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

Web Title : पीएम मोदी ने विजय-रश्मिका को शादी की शुभकामनाएँ दीं।

Web Summary : विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना उदयपुर में शादी करने वाले हैं। पीएम मोदी ने पत्र भेजकर उन्हें सुखी वैवाहिक जीवन की शुभकामनाएं दीं। उन्होंने निमंत्रण के लिए धन्यवाद दिया और उनके सुख और समृद्धि की कामना की।

Web Title : PM Modi wishes Vijay-Rashmika for wedding with special letter.

Web Summary : Vijay Deverakonda and Rashmika Mandanna are set to marry in Udaipur. PM Modi sent a letter, wishing them a happy married life. He thanked them for the invitation and wished them happiness and prosperity.