प्रविण तरडेंचा साऊथ सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, 'अहो विक्रमार्का'ची रिलीज डेट जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:56 IST2024-07-22T13:55:37+5:302024-07-22T13:56:21+5:30
मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं होतं. आता सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.

प्रविण तरडेंचा साऊथ सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, 'अहो विक्रमार्का'ची रिलीज डेट जाहीर
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे अभिनयाबरोबरच त्यांच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. 'धर्मवीर', 'मुळशी पॅटर्न', 'सरसेनापती हंबीरराव' यांसारख्या चित्रपटातून प्रवीण तरडेंनी दिग्दर्शनाबरोबरच अभिनयाचीही छाप पाडली. आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. 'अहो विक्रमार्का' या सिनेमातून प्रविण तरडे साऊथमध्ये एन्ट्री घेत आहेत. त्यांच्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं होतं. या पोस्टरमध्ये त्यांचा दमदार लूक पाहायला मिळला होता. आता सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. प्रविण तरडेंचा हा सिनेमा येत्या ३० ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पोस्ट करत अभिनेत्याने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. प्रविण तरडेंचा साऊथ सिनेमा पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
एस. एस. राजामौली फिल्म्सचे सहाय्यक दिग्दर्शख त्रिकोटी पेटा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर डॉ. मिहीर कुलकर्णी यांनी निर्मिती केली आहे. तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगालीसह मराठी अशा एकूण ७ भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.