रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:25 IST2025-10-29T17:25:08+5:302025-10-29T17:25:48+5:30
सध्या प्रभासच्या याच सीनची चर्चा मनोरंजनविश्वात सुरु आहे.

रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
सुपरस्टार प्रभास सध्या आगामी 'स्पिरीट' सिनेमामुळे चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. वांगा यांच्या 'अॅनिमल' सिनेमाने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता. त्यात रणबीर कपूर कधीही न पाहिलेल्या अशा लूकमध्ये समोर आला होता. सिनेमात रणबीरने न्यूड सीनही दिला होता. तर आता 'स्पिरीट'मध्येही प्रभासचा न्यूड सीन असल्याची चर्चा आहे. सिनेमाच्या ऑडिओ क्लिपमधून ही हिंट मिळाली आहे.
प्रभासने नुकताच ४६ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त 'स्पिरिट'ची एक ऑडिओ क्लिप खास चाहत्यांसाठी शेअर करण्यात आली. यामध्ये जेलर आणि त्याचा असिस्टंट चर्चा करत असतात. जेलर असिस्टंट डेकोरम मेंटेन करण्याची सूचना करत असतो. यानंतर जेलर त्याला तुझे सगळे कपडे काढ असं सांगतो. याच डायलॉगवरुन चाहत्यांनी प्रभासच्या न्यूड सीनचा अंदाज लावला आहे.
सध्या प्रभासच्या याच सीनची चर्चा मनोरंजनविश्वात सुरु आहे. मेकर्सने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच हा सीन शेवटपर्यंत सीक्रेटच ठेवला जाईल अशीही शक्यता आहे.'स्पिरीट' सिनेमाची काही महिन्यांपूर्वीही चर्चा होती. सिनेमातून दीपिका पादुकोणला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तर तिच्या जागी तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षी सिनेमा रिलीज होणार आहे.