IMDb वर ८.० रेटिंग, 'या' थ्रिलर सिनेमाची होतेय तुफान चर्चा, ओटीटीवरही ट्रेडिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 17:28 IST2025-08-03T17:28:10+5:302025-08-03T17:28:28+5:30
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा अजून एक मास्टरपीस अनुभवायचा असेल, तर हा चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवाच!

IMDb वर ८.० रेटिंग, 'या' थ्रिलर सिनेमाची होतेय तुफान चर्चा, ओटीटीवरही ट्रेडिंग!
सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांत दाक्षिणात्य चित्रपटांची संख्या सर्वाधिक आहे. एकामागून एक मोठ्या बजेटचे चित्रपट बनत आहेत. याचदरम्यान कमी बजेटच्या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
दक्षिणेचा सिनेमा म्हटलं की थ्रिल, सस्पेन्स आणि भन्नाट कथा यांचा तगडा मेळ असतोच. याचाच प्रत्यय तुम्हाला नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातून येईल. सध्या एक सायकॉलॉजिकल थ्रिलर ओटीटीवर ट्रेडिंगमध्ये आहे.
'किष्किंधा कांडम' (Kishkindha Kaandam) असं या चित्रपटाचं नाव आहे. हा २०२४ चा भारतीय मल्याळम भाषेतील मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. जो दिनजीथ अय्याथन दिग्दर्शित आहे आणि बहुल रमेश लिखित आहे. या चित्रपटात आसिफ अली, अपर्णा बालमुरली, विजयराघवन, जगदीश आणि अशोकन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे पार्श्वसंगीत जबरदस्त आहे. ते या चित्रपटाचे थ्रिल वाढवते. तसेच चित्रपटातील दृश्ये खूप प्रभावीपणे शूट करण्यात आली आहे.
'किष्किंधा कांडम' आयएमडीबीवर ७.२ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट तुम्हाला घरबसल्या मल्याळम, हिंदी, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये पाहता येईल. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा (JioCinema) वर उपलब्ध आहे. थ्रिलरप्रेमींसाठी 'किष्किंधा कांडम' म्हणजे एक जबरदस्त ट्रीट आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीचा अजून एक मास्टरपीस अनुभवायचा असेल, तर आजच हा चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवाच.
'किष्किंधा कांडम'चे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन
'किष्किंधा कांडम' या चित्रपटाचे बजेट फक्त सात कोटी रुपये होते. या चित्रपटाने भारतात तब्बल ४९.०२ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने ७६.५२ रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. चित्रपटाची कथा नेमकी काय आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट पाहणं अनिवार्य ठरतं.