"तो माझा मित्र होता पण...", धनुषसोबतच्या वादावर स्पष्टच बोलली नयनतारा; नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:20 IST2024-12-12T13:18:39+5:302024-12-12T13:20:04+5:30
धनुषसोबत नक्की काय वाद झाला? नयनताराने स्पष्टच सांगितलं

"तो माझा मित्र होता पण...", धनुषसोबतच्या वादावर स्पष्टच बोलली नयनतारा; नेमकं घडलं काय?
साऊथ कलाकार नयनतारा (Nayanthara) आणि अभिनेता धनुष (Dhanush) यांच्यातील वाद आता कोर्टात गेला आहे. नयनताराने तिच्या नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंटरीमध्ये धनुषच्या निर्मितीखाली झालेल्या सिनेमातील ३ सेकंदाचा व्हिडिओ वापरला. यावरुन धनुषने तिला कायदेशीर नोटीस पाठवली. नयनताराने सोशल मीडियावरच धनुषसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत नयनताराने या वादावर पहिल्यांदाच मौन सोडलं.
'द हॉलिवूड रिपोर्टर ऑफ इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत नयनतारा म्हणाली, "हा वाद होईल असं आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं. डॉक्युमेंटरी येण्याच्या काही दिवस आधी हे होईल याची कल्पनाच नव्हती. कदाचित वेळच तशी होती. कारण तेव्हाच आम्हाला कायदेशीर नोटीस मिळाली होती, आम्ही २-३ दिवस विचार केला. पण जे योग्य आहे ते करायला मी का घाबरु. मी जर काही चुकीचं करत असेल तर मला घाबरायची गरज आहे. प्रसिद्धीसाठी एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. अनेक जणांनी मला पाठिंबा दिला तर काही जणांनी त्यालाही पाठिंबा दिला. पण सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हा आमचा पब्लिसिटी स्टंट होता तर असं अजिबातच नाही.
मी जाहीरपणे यावर बोलले यामुळे वाद झाला. मी प्रामाणिकपणे आधी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता. काय प्रॉब्लेम आहे आपण चर्चा करु असा माझा मानस होता. आम्ही त्याच्या मॅनेरजपर्यंत पोहोचलो, त्याच्या मित्रांशी संपर्क साधला पण काहीच झालं नाही. मग एक पॉईंट असा आला की आम्ही ठरवलं की ठिके आपण त्याच्या सिनेमातली क्लिप वापरायला नको. आम्ही पुढे निघालो. मग आम्ही फक्त विघ्नेशची वाक्य वापरायचं ठरवलं कारण ते आमच्या फारच जवळचं होतं. धनुष माझा मित्र आहे त्यामुळे या क्लिपसाठी तो नाही म्हणणार नाही असं मला वाटलं होतं. पण या काही वर्षात असं काय बदललं माहित नाही. मी त्याच्या मॅनेजरशी बोलून धनुषशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. पण तेही झालं नाही. आम्ही ठिके म्हणत सोडून दिलं. पण जेव्हा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यात आमच्या फोनमध्ये रेकॉर्ड केलेलं बीटीएस फुटेज त्यात होतं यावरूनही त्याने आक्षेप घेतला. १० वर्षांपूर्वीचं बीटीएस फुटेज हा सिनेमाचा भाग असूच शकत नाही त्यामुळे आम्ही काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही. तो एवढा प्रसिद्ध आहे, त्याचे इतके चाहते आहेत त्याच्याकडून माझ्यावर असा अन्याय होत असेल तर मी बोलणार आणि मी तेच केलं. त्यामुळेच मला वाटतं जर अन्याय होत असेल तर आपण बोललंच पाहिजे."