नागा चैतन्यनं शोभिताच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र, पाहा लग्नातील खास Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:49 IST2024-12-05T11:42:11+5:302024-12-05T11:49:37+5:30

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाच्या विधीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

Naga Chaitanya Puts Mangal Sutra Around Sobhita Dhulipala's Neck Watch Video | नागा चैतन्यनं शोभिताच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र, पाहा लग्नातील खास Video

नागा चैतन्यनं शोभिताच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र, पाहा लग्नातील खास Video

Sobhita Dhulipala-Naga Chaitanya wedding : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला विवाहसोहळा अखेर काल  ४ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये मोठ्या थाटामाटात हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता.   नागा चैतन्य आणि शोभिताला आशिर्वाद देण्यासाठी तेलुगू इंडस्ट्रीमधली अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. 

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाच्या विधीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. लग्न मंडपातील एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शोभिताच्या गळ्यात मंगळसुत्र बांधताना नागा चैतन्य दिसतोय. यावेळी वर, वधू आणि कुटुंबीय आनंदात असल्याच पाहायला मिळतेय. 


नागा चैतन्य आणि शोभिता हे दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत असून दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडलीये.  लग्नात केसांपासून ते पायपर्यंत नखशिखांत सजलेली शोभिता अतिशय सुंदर दिसत होती. तर ऑफ व्हाईट कलरच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये नागा चैतन्यही एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता.  या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केलाय.
 

Web Title: Naga Chaitanya Puts Mangal Sutra Around Sobhita Dhulipala's Neck Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.