तुमच्या कामाशी काम ठेवा! कमल हासन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:16 IST2026-03-08T13:13:50+5:302026-03-08T13:16:12+5:30

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन सध्या त्यांच्या एका धाडसी पत्रामुळे चर्चेत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत कमल हासन यांनी त्यांना थेट सुनावले आहे

Mind Your Own Business kamal haasan open letter to us president donald trump | तुमच्या कामाशी काम ठेवा! कमल हासन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून दिली समज

तुमच्या कामाशी काम ठेवा! कमल हासन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून दिली समज

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन सध्या त्यांच्या एका धाडसी पत्रामुळे चर्चेत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत कमल हासन यांनी त्यांना थेट सुनावले आहे. कमल हासन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र प्रसिद्ध केले असून, त्यात त्यांनी ट्रम्प यांना "तुमच्या कामाशी काम ठेवा" (Mind Your Own Business) असा स्पष्ट इशारा दिला आहे. 

 कमल हासन यांनी कडक शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, भारत हा एक स्वावलंबी आणि प्रगल्भ लोकशाही असलेला देश आहे. आम्हाला आमचे प्रश्न कसे सोडवायचे हे चांगले ठाऊक आहे, त्यामुळे अमेरिकेने किंवा त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याची किंवा आमच्या कामात ढवळाढवळ करण्याची अजिबात गरज नाही.

ट्रम्प यांना आक्रमक शैलीतच कमल हासन यांनी उत्तर देताना पुढे लिहिले की, "मिस्टर प्रेसिडेंट, तुम्ही तुमच्या देशातील समस्यांकडे लक्ष द्या, भारताला स्वतःचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आणि सामर्थ्य आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा." एका भारतीय अभिनेत्याने थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अशा प्रकारे आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

कमल हासन यांच्या या भूमिकेनंतर इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक भारतीयांनी त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले असून, देशाच्या स्वाभिमानासाठी उभे राहणारा कलाकार अशा शब्दांत त्यांचे समर्थन केले आहे. दुसरीकडे, काही टीकाकारांनी याला केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. कमल हासन हे केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. 

Web Title : कमल हासन ने ट्रम्प से कहा: अपने काम से काम रखो!

Web Summary : कमल हासन ने डोनाल्ड ट्रम्प की आलोचना करते हुए भारत की संप्रभुता पर जोर दिया और उन्हें अपने देश के मुद्दों पर ध्यान केंद्रित करने के लिए कहा। इससे मिली-जुली प्रतिक्रियाएं आईं।

Web Title : Kamal Haasan to Trump: Mind your own business!

Web Summary : Kamal Haasan criticized Donald Trump in a letter, asserting India's sovereignty and telling him to focus on his own country's issues. This statement sparked mixed reactions.