२७ कोटी बजेट अन् कमाई २०० कोटींपेक्षा जास्त! ओटीटीवरील 'हा' ट्रेंडिंग चित्रपट पाहून 'कांतारा', 'तुंबाड' विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:57 IST2025-12-18T17:42:32+5:302025-12-18T17:57:36+5:30
थरकाप उडवणारा हॉरर-थ्रिलर चित्रपट ओटीटीवर होतोय ट्रेंड, तुम्ही बघितला?

२७ कोटी बजेट अन् कमाई २०० कोटींपेक्षा जास्त! ओटीटीवरील 'हा' ट्रेंडिंग चित्रपट पाहून 'कांतारा', 'तुंबाड' विसराल
Ott Movies: अनेकांना ओटीटीवर नवनवीन चित्रपट पाहायला आवडतात. हल्ली प्रेक्षकांमध्ये डिजीटल प्लॅटफॉर्मवर दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याची कमालीची क्रेझ वाढली आहे. या चित्रपटांची चर्चा तितकीच होते. त्यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटीवर देखील राज्य करतात. असाच एक चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. अवघ्या २७ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. कथा आणि स्पेन्सरच्या बाबतीत हा सिनेमा'कांतारा' आणि 'तुम्बाड' सारख्या चित्रपटांना टक्कर देत आहे.
प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा हा चित्रपट १५ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मळ्यालम सुपरस्टार मामूटी यांची प्रमुख भूमिका होती. ब्रमयुग असं या चित्रपटाचं नाव आहे. राहुल सदाशिवन यांनी या हॉरर थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
कथानक
'ब्रह्मयुगम'ची कथा थेवन नावाच्या एका तरुण गायकाभोवती फिरते, जो एका विशिष्ट समुदायाचा असतो. 'ब्रमयुगम’ मध्ये गुलामगिरीतून सुटका झालेल्या गायकाची कथा उलगडून दाखवली जाते जो एका रहस्यमयी अशा घरात आश्रय घेतो, परंतु आत राहणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीमुळे त्याला काही भयानक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यानंतर ही कथा एक रोमांचक वळणावर येते.हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंच खुर्चीला खिळून ठेवतो.
ब्रमयुगम हा चित्रपट अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला असून, तो आता मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.या चित्रपटात ममूटी यांच्याव्यतिरिक्त सिद्धार्थ भरथन आणि अर्जुन अशोकन यांसारख्या कलाकारांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.