थिएटरमध्ये गाजलेला 'महावतार नरसिंह' आता ओटीटीवर रिलीज; कधी अन् कुठे बघाल? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:57 IST2025-09-19T10:56:22+5:302025-09-19T10:57:00+5:30
'महावतार नरसिंह' आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घ्या कधी आणि कोणत्या ओटीटीवर सिनेमा पाहता येईल

थिएटरमध्ये गाजलेला 'महावतार नरसिंह' आता ओटीटीवर रिलीज; कधी अन् कुठे बघाल? जाणून घ्या
'महावतार नरसिंह' हा ॲनिमेटेड चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. हा चित्रपट थिएटरमध्ये चांगलाच गाजला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा चित्रपट सर्वांना आवडला. आता थिएटरमध्ये गर्जना केल्यानंतर 'महावतार नरसिंह' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे सर्वांना हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची उत्सुकता आहे. जाणून घ्या 'महावतार नरसिंह' कधी रिलीज होणार आणि कुठे पाहता येणार.
'महावतार नरसिंह' कुठे बघाल?
'महावतार नरसिंह' चित्रपट आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आज १९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता 'महावतार नरसिंह' चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत x अकाउंटवरून या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याची माहिती देण्यात आली आहे. 'भक्ती आता शक्तीचे रूप धारण करणार आहे. महावतार नरसिंह येत आहे,' असं कॅप्शन या पोस्टरवर लिहिलेलं आहे. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नाही त्यांना आता घरबसल्या 'महावतार नरसिंह' पाहण्याची संधी मिळणार आहे.
'महावतार नरसिंह' चित्रपटाविषयी
अश्विन कुमार दिग्दर्शित हा 'महावतार नरसिंह' हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट 'महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स'मधील पहिला भाग आहे, जो भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित आहे. होम्बाळे फिल्म्सने निर्मित केलेला हा चित्रपट भक्त प्रल्हादची कथा सांगतो आणि भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचे भव्य रुप दाखवतो. या फ्रेंचाइजमध्ये 'महावतार परशुराम', 'महावतार रघुनंदन' आणि इतर चित्रपट देखील येणार आहेत.