बहुचर्चित 'कांतारा चाप्टर १'चा ट्रेलर कधी रिलीज होणार? समोर आली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:11 IST2025-09-12T10:57:01+5:302025-09-12T11:11:34+5:30

'कांतारा चाप्टर १'च्या ट्रेलरची उत्सुकता आहे. समोर आली मोठी अपडेट. जाणून घ्या

Kantara Chapter 1 trailer release date update rishabh shetty rukmini vasanth | बहुचर्चित 'कांतारा चाप्टर १'चा ट्रेलर कधी रिलीज होणार? समोर आली मोठी अपडेट

बहुचर्चित 'कांतारा चाप्टर १'चा ट्रेलर कधी रिलीज होणार? समोर आली मोठी अपडेट

'कांतारा: चॅप्टर १' या चित्रपटाची सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सिनेमाबद्दल प्रेक्षकांना कुतुहल आहे. सिनेमा रिलीज व्हायला अवघे काही दिवस बाकी असताना 'कांतारा: चॅप्टर १'चा ट्रेलर कधी येणार, असा सर्वांच्या मनात प्रश्न आहे. ऋषभ शेट्टीने सुद्धा याबद्दल अधिकृत घोषणा केली नाहीये. अशातच 'कांतारा: चॅप्टर १'च्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे. जाणून घ्या.

'कांतारा: चॅप्टर १'चा ट्रेलर कधी येणार?

 मीडिया रिपोर्टनुसार 'कांतारा: चॅप्टर १' चा ट्रेलर २० सप्टेंबर रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते गांधी जयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच २ ऑक्टोबर, २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. थिएटर रिलीजच्या आधी सिनेमाचं जोरदार करण्याच्या उद्देशाने 'कांतारा: चॅप्टर १' चा ट्रेलर २० सप्टेंबरच्या आसपास रिलीज केला जाईल, असं बोललं जातंय. याविषयी अधिकृत घोषणा कधी होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

गेल्या वर्षी 'कांतारा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवल्यानंतर, 'कांतारा: चॅप्टर १' कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट 'कांतारा' चा प्रिक्वेल असून, यामध्ये ऋषभ शेट्टी एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे ओटीटी हक्क ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने १२५ कोटींना विकत घेतले आहेत. चित्रपटाचे व्हिज्युअल अधिक प्रभावी करण्यासाठी जगभरातील सुमारे २० व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ काम करत आहेत. हा सिनेमा दसरा आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे 'कांतारा'च्या चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणी असणार आहे.

Web Title: Kantara Chapter 1 trailer release date update rishabh shetty rukmini vasanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.