अक्षय कुमार 'महादेव' तर प्रभास 'रुद्र'; 'कन्नप्पा' चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा, 'या' दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:56 IST2025-06-15T12:55:45+5:302025-06-15T12:56:13+5:30

कन्नप्पा चित्रपटाच्या अनोख्या ट्रेलरची चर्चा आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे

kannappa movie trailer Akshay Kumar is Mahadev and Prabhas is Rudra | अक्षय कुमार 'महादेव' तर प्रभास 'रुद्र'; 'कन्नप्पा' चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा, 'या' दिवशी होणार रिलीज

अक्षय कुमार 'महादेव' तर प्रभास 'रुद्र'; 'कन्नप्पा' चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा, 'या' दिवशी होणार रिलीज

मुकेश कुमार सिंह दिग्दर्शित आणि विष्णु मान्चू निर्मित ‘कन्नप्पा’ या पॅन इंडिया चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर २ मिनिट ५५ सेकंदांचा असून, प्रेक्षकांना कन्नप्पा या योद्धाचा नास्तिक ते आस्तिक बनण्याचा प्रवास या चित्रपटातून बघायला मिळतो. या चित्रपटात मुख्य अभिनेता विष्णु मान्चू यांनी कन्नप्पा या नास्तिक योद्ध्याची भूमिका केली आहे. या ट्रेलरमध्ये कन्नप्पाचा शिवभक्त होण्यापर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. अक्षय कुमारने महादेवाच्या भूमिकेत सर्वांचं लक्ष वेधलंय.

‘कन्नप्पा’ चित्रपटाचा ट्रेलर

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसतं की, कन्नप्पा हा एका डोंगराळ भागात राहत असताो. अन्याय करणाऱ्या दुष्ट योद्ध्यांसोबत तो लढाई करताना दिसतो. ट्रेलरमध्ये प्रभास ‘रुद्र’ या महत्त्वपूर्ण पात्रात दिसतो, जो महादेवाचं रुप म्हणून पृथ्वीवर कार्य करतो. याशिवाय अक्षय कुमारने या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू सिनेमा जगतात पदार्पण करताना भगवान शिवाची भूमिका साकारली आहे, तर मोहनलाल ‘किरात’ या शक्तिशाली व्यक्तिमत्त्वात दिसणार आहेत. अल्पावधीत या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे.

‘कन्नप्पा’ कधी रिलीज होणार

‘कन्नप्पा’ या चित्रपटात मुख्य कलाकारांमध्ये काजल अग्रवाल, मोहन बाबू, सरत कुमार, ब्रह्मानंदम सारख्या कलाकारांचा समावेश असून, हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी तेलगूसोबत अन्य भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 'कन्नप्पा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच इंदौरमध्ये होणार होता, परंतु अहमदाबाद विमान अपघातानंतर अक्षय कुमार-विष्णु मांचू या दोघांनी हा ट्रेलर लाँच पुढे ढकलला आहे. अक्षय कुमार, प्रभास, मोहनलाल या मोठ्या कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: kannappa movie trailer Akshay Kumar is Mahadev and Prabhas is Rudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.