थिएटरमध्ये गाजलेला मल्टीस्टार 'कन्नप्पा' ओटीटीवर कधी होणार रिलीज, कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:36 IST2025-08-01T11:33:27+5:302025-08-01T11:36:49+5:30
'कन्नप्पा' हा एक मल्टीस्टार चित्रपट आहे.

थिएटरमध्ये गाजलेला मल्टीस्टार 'कन्नप्पा' ओटीटीवर कधी होणार रिलीज, कुठे बघाल?
२०२५ मध्ये बरेच मराठी सिनेमे रिलीज झाले. हे सर्व सिनेमे प्रेक्षकांनाही तितकेच आवडले. यापैकी एक महत्वाचा सिनेमा म्हणजे 'कन्नप्पा' (Kannappa). मोहनलाल, शिवराज कुमार, नयनतारा, तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, आर. सरथकुमार, ब्रह्मानंदम, प्रभास आणि अक्षय कुमार यांची भूमिका असलेला 'कन्नप्पा'हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सहकुटुंब, सहपरिवार हा सिनेमा आता घरबसल्या बघायला मिळणार आहे. जाणून घ्या कधी आणि कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार.
दक्षिणात्य चित्रपट 'कन्नप्पा'च्या ओटीटी रिलीजबाबत प्रतीक्षा आणखी वाढली आहे. मूळतः २५ जुलै रोजी Amazon Prime Videoवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. परंतु अद्याप चित्रपट ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी आलेला नाही. नव्या माहितीनुसार, विष्णू मंचूचा हा पौराणिक चित्रपट आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होऊ शकतो. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
कन्नप्पा २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर मोठ्या अपेक्षा असतानाही, देशांतर्गत केवळ ३२ कोटी आणि जागतिक स्तरावर ४५ कोटींचा गल्ला जमवून हा चित्रपट फ्लॉप ठरला. 'कन्नप्पा' चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, हा एक पौराणिक चित्रपट आहे, त्याचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंह यांनी केले आहे.