Video: आरारारा... खतरनाक! ४७ वर्षांनंतर रजनीकांत-कमल हासन एकत्र, प्रोमोने घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:45 IST2026-02-21T14:42:56+5:302026-02-21T14:45:03+5:30

Kamal Haasan And Rajinikanth Reunion: रजनीकांत-कमल हासनची जोडी परतली! नव्या चित्रपटाचा अनाउंसमेंट प्रोमो व्हायरल

Kamal Haasan And Rajinikanth Reunion: new movie promo release | Video: आरारारा... खतरनाक! ४७ वर्षांनंतर रजनीकांत-कमल हासन एकत्र, प्रोमोने घातला धुमाकूळ

Video: आरारारा... खतरनाक! ४७ वर्षांनंतर रजनीकांत-कमल हासन एकत्र, प्रोमोने घातला धुमाकूळ

Kamal Haasan And Rajinikanth Reunion: चाहते ज्याची अनेक दशकांपासून प्रतिक्षा करत होते, तो क्षण अखेर आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्स कमल हासन आणि रजनीकांत तब्बल ४७ वर्षांनंतर एका चित्रपटात दिसणार आहेत. आगामी चित्रपटाचा अधिकृत अनाउंसमेंट प्रोमो आज(२१ फेब्रुवारी) प्रदर्शित झाला असून, या व्हिडिओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

नेल्सनचे दिग्दर्शन अन् अनिरुद्धचे संगीत...

या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार करणार आहेत, तर रेड जायंट मूव्हीज या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तसेच, प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याच्याकडे चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी असेल. सुमारे साडेतीन मिनिटांचा हा अनाउंसमेंट व्हिडिओ चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट ठरला आहे. प्रोमोच इतका भन्नाट आहे, ज्यामुळे चित्रपटाची आतुरता वाढली आहे.

1979 नंतर पहिल्यांदाच एकत्र काम...

दरम्यान, कमल हासन आणि रजनीकांत यांनी शेवटचे १९७९ मधील ‘अलाउद्दीनम अलभुथा विलक्कुम’ या फँटसी चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर जवळपास ४७ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

प्रोमोमध्ये काय खास?

अनाउंसमेंट व्हिडिओमध्ये दोन्ही सुपरस्टार्समधील मजेशीर नोकझोक पाहायला मिळते. सुरुवातीला ते आपल्या लूक आणि कपड्यांबाबत चर्चा करताना दिसतात. विशेष म्हणजे, दोघेही रेट्रो स्टाइलमध्ये एकसारख्या कपड्यांत (ट्विनिंग) दिसतात, ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. व्हिडिओमध्ये दिग्दर्शक नेल्सन आणि संगीतकार अनिरुद्ध यांच्याशी झालेला गमतीशीर संवादही आहे.

‘हीरो कोण?’ डायलॉगने जिंकली मने

प्रोमोमधील गाडीतील एक सीन विशेष लक्ष वेधतो. या सीनमध्ये कमल हासन अनिरुद्धला विचारतात, “आधी हे सांग, हीरो कोण?” त्यावर रजनीकांत मिश्किलपणे उत्तर देतात, “विचारताय तर सांगा ना, कोण आहे हीरो?” हा संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संवादामुळे चित्रपटात कोण हिरो अन् कोण विलेन असेल, याची उत्सुकता वाढली आहे. 

विशेष म्हणजे, नेल्सन याने यापूर्वी रजनीकांतसोबत ‘जेलर’ या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे, तर सध्या ‘जेलर 2’ चे शूटिंग सुरू आहे. अशा परिस्थितीत कमल हासन आणि रजनीकांत या जोडीचा हा नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो, याकडे साऱ्या चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kamal Haasan And Rajinikanth Reunion: new movie promo release