यापुढे Junior NTR करणार नाही सिनेमात काम?; चाहत्याच्या प्रश्नाच उत्तर देत केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:21 PM2024-01-25T12:21:53+5:302024-01-25T12:22:27+5:30

Junior NTR: 'तर मी सिनेमा करणं बंद करेन'; चाहत्यांच्या प्रश्नाला कंटाळलेल्या ज्युनिअर NTR चं विधान चर्चेत

junior-ntr-said-that-he-will-not-sign-any-films-in-hyderabad | यापुढे Junior NTR करणार नाही सिनेमात काम?; चाहत्याच्या प्रश्नाच उत्तर देत केलं मोठं विधान

यापुढे Junior NTR करणार नाही सिनेमात काम?; चाहत्याच्या प्रश्नाच उत्तर देत केलं मोठं विधान

सध्या प्रेक्षकांमध्ये साऊथ इंडस्ट्रीची क्रेझ असल्याचं दिसून येत आहे. यात खासकरुन दाक्षिणात्य कलाकारांनी तर प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. यामध्येच सध्या साऊथच्या सुपरस्टार ज्युनिअर NTR याची चर्चा रंगली आहे. लवकरच त्याचा 'एनटीआर 30'  हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने अलिकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी चाहत्यांच्या प्रश्नाला कंटाळून, 'मी सिनेमात काम करणं बंद करेन', असं वक्तव्य 'Junior NTR ने केलं. त्याच्या या वक्तव्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

नुकताच Junior NTR  हा हैदराबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात चाहते त्याला सतत सिनेमाविषयी प्रश्न विचारत होते. त्यामुळे सतत होणाऱ्या प्रश्नांच्या भडीमाराला कंटाळून Junior NTR ने थक्क करणारं विधान केलं. ज्यामुळे सगळेच अचंबित झाले.

नेमकं काय म्हणाला Junior NTR ?

"मी कोणताही सिनेमा करत नाहीये. आणि,जर तुम्ही सतत एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत असाल तर मी सिनेमात काम करणं बंद करेन", असं Junior NTR म्हणाला.  दरम्यान, Junior NTR चा 'एनटीआर 30' हा सिनेमा येत्या ५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे Junior NTR हा या सिनेमामध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने जान्हवी कपूर तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

Web Title: junior-ntr-said-that-he-will-not-sign-any-films-in-hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.