ज्युनिअर एनटीआरला पाहून चाहते चिंतेत, का झालाय इतका बारीक? टीमनं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:49 IST2025-04-18T14:48:33+5:302025-04-18T14:49:01+5:30

ज्युनिअर एनटीआर हा अतिशय बारीक दिसत असून त्याला नेमकं काय झालंय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. 

Jr Ntr’s Drastic Weight Loss Fans Are Worried After Seeing So Thin Team Clarifies Actor Drops 14 Kgs For Prashanth Neel's Upcoming Movie | ज्युनिअर एनटीआरला पाहून चाहते चिंतेत, का झालाय इतका बारीक? टीमनं केला खुलासा

ज्युनिअर एनटीआरला पाहून चाहते चिंतेत, का झालाय इतका बारीक? टीमनं केला खुलासा

Jr Ntr’s Drastic Weight Loss: ज्युनिअर एनटीआर हा मोठा सुपरस्टार आहे. फक्त साऊथच नव्हे तर जगभरात तो चांगलाच लोकप्रिय आहे. फिट & फाईन अशी ओळख असलेल्या ज्युनिअर एनटीआरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून चाहते चिंतेत पडले आहेत. या फोटोत एनटीआर अतिशय बारीक दिसत असून त्याला नेमकं काय झालंय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. 

ज्युनियर एनटीआरचा निळा शर्ट आणि काळ्या पँटमधील एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत तो दुबईतील हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत पोज देताना दिसतोय. या फोटोत तो एकदम सडपातळ दिल्यानं सर्वजण चकित झालेत. सोशल मीडियावर चाहते ज्युनिअर एनटीआरनं वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक इंजेक्शनचा वापर केलाय का? अभित्याची तब्येत बरी नाही का? त्याने कोणती सर्जी केली आहे का? असे अनेक प्रश्न चाहते विचारत आहेत. यावर आता ज्युनिअर एनटीआरच्या टीमने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सत्य सांगितलंय. अभित्यासंंबधित सर्व अफवा खोट्या आहेत. तो निरोगी आहे आणि त्याने कोणतंही ओझेम्पिक इंजेक्शन घेतलेलं नाही. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी केलंय. गेल्या फेब्रुवारीपासून दिग्दर्शक प्रशांत नीलच्या पुढील प्रोजेक्टसाटी (Jr NTR Upcoming Movie)  त्यानं एक वेगळी फिटनेस आणि आहार दिनचर्या स्वीकारली आहे. हा बदल त्याचाच परिणाम आहे", असं म्हटलं.  


ज्युनिअर एनटीआर सध्या सडपातळ झाल्यानं ट्रोल होतोय. पण, एकेकाळी लठ्ठपणा आणि दिसण्यावरुन कुरुप म्हणत त्याची अवहेलना करण्यात आली होती.  त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण, हार न मानता त्यानं प्रचंड मेहनत घेतली आणि स्वता:ला सिद्ध केलं.एका रॉयल घराण्यात जन्मलेल्या ज्युनिअर एनटीआरला सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव नंदमुरी तारक रामा राव ज्युनिअर असं आहे. पण, त्याचे आजोबा तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते एन टी रामाराव यांच्या नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. आज ४५० कोटींचा मालक असलेला ज्युनिअर एनटीआर आलिशान आयुष्य जगतो. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.


ची एकूण संपत्ती ४५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. अभिनेत्याचं हैदराबादमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत 25 कोटी रुपये आहे. तसेच हैदराबादमध्ये एक फार्महाऊस, मुंबई आणि बंगळुरूमध्ये एक घर आहे. ज्युनिअर एनटीआरला गाड्यांचीदेखील प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्युनिअर एनटीआर एका चित्रपटासाठी 50-60 कोटी रुपयांचं मानधन घेतो. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये ज्युनिअर एनटीआरचा समावेश होतो. अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा 'देवरा' Devra) चित्रपटात दिसला होता. तर लवकरच तो 'वॉर २'मध्ये दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Jr Ntr’s Drastic Weight Loss Fans Are Worried After Seeing So Thin Team Clarifies Actor Drops 14 Kgs For Prashanth Neel's Upcoming Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.