'जेलर' फेम अभिनेता विनायनकला अटक, नशेत पोलिस ठाण्यातच घातला धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:19 IST2023-10-25T11:18:25+5:302023-10-25T11:19:25+5:30
अभिनेता विनायकनला जेव्हा पोलिस ठाण्यात आणले गेले तेव्हा तो नशेत होता.

'जेलर' फेम अभिनेता विनायनकला अटक, नशेत पोलिस ठाण्यातच घातला धुमाकूळ
थलायवा अभिनेता रजनीकांतचा (Rajinikanth) नुकताच 'जेलर' सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमातील खलनायक वर्मनच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता विनायकनला (Vinayakan) अटक करण्यात आली आहे. विनायकनने एर्नाकुलम टाऊन नॉर्थ पोलिस ठाण्यात नशेत हंगामा केल्याचं समोर आलं आहे. केरळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 'पीटीआय'च्या वृत्तानुसार विनायकनने त्याच्या अपार्टमेंटमध्ये हंगामा केला होता. त्यामुळे त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते.
अभिनेता विनायकनला जेव्हा पोलिस ठाण्यात आणले गेले तेव्हा तो नशेत होता. त्याने तिथेही हंगामा सुरु केला. यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनुसार,'विनायकनला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. यानंतर त्याच्यावर नियमानुसार कारवाई होईल.'
विनायकन तमिळ आणि मल्याळम अभिनेता आहे. तो डान्सर आणि म्यूझिक कंपोजरही आहे. रजनीकांत स्टारर जेलर सिनेमात त्याची खलनायक भूमिका खूपच आवडली होती. सिनेमात रजनीकांतच्या टक्करला अभिनेता विनायकन दिसला. या सिनेमानंतर तो जास्त लोकप्रिय झाला.
विनायकनने 1995 साली मल्याळम सिनेमातून करिअरला सुरुवात केली. याआधी तो एक डान्सर होता ज्याचं नाव 'ब्लॅक मर्करी' असं होतं. फायर डान्समध्ये विनायकन तरबेज आहे.