Video:"मी द्रोणपुत्र, अश्वत्थामा!", अमिताभ बच्चन यांचा कधीही न पाहिलेला अवतार, भन्नाट टिझर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 10:31 IST2024-04-22T10:29:07+5:302024-04-22T10:31:46+5:30

'कल्की 2898 AD' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचा खुलासा झाला असून खास व्हिडीओ भेटीला आलाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (kalki, amitabh bachchan)

Introducing Ashwatthama from Kalki 2898 AD Amitabh bachchan teaser video | Video:"मी द्रोणपुत्र, अश्वत्थामा!", अमिताभ बच्चन यांचा कधीही न पाहिलेला अवतार, भन्नाट टिझर बघाच

Video:"मी द्रोणपुत्र, अश्वत्थामा!", अमिताभ बच्चन यांचा कधीही न पाहिलेला अवतार, भन्नाट टिझर बघाच

गेल्या अनेक दिवसांपासून अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'कल्की' सिनेमाची उत्सुकता आहे. काल संध्याकाळी सिनेमाचं पोस्टर लॉंच झालं. यात शरीराभोवती गुंडाळलेल्या पट्टीत अमिताभ दिसत होते. आणि कालच IPL  सामन्यादरम्यान कल्की सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचा खुलासा झाला. सिनेमाच्या टीमने अमिताभ यांचा खास व्हिडीओ रिलीज केलाय. 

'कल्की 2898 AD' सिनेमातील अमिताभ बच्चन यांंच्या भूमिकेचा खुलासा झाला. व्हिडीओत पाहायला मिळेल की अमिताभ एका गुहेत शिवलिंगासमोर तपश्चर्या करत आहेत. तिथे एक छोटा मुलगा ज्याचं नाव राया असतं तो येऊन त्यांना भेटतो. "इतका जखमी होऊनही तू जिवंत कसा, तू देव आहेस का..?" असा प्रश्न तो छोटा मुलगा अमिताभ यांना विचारतो.  इतक्यात अमिताभ त्या मुलाला थांबवतात. 

"माझी वेळ आली आहे. अखेरचं युद्ध करण्याची वेळ आलीय. द्वापारयुगापासून मी अवतार घेण्याची वाट पाहतोय. मी द्रोणपुत्र.. अश्वत्थामा", असं अमिताभ त्या मुलाला म्हणतात आणि निघून जातात. 'कल्की 2898 AD' चा हा जबरदस्त व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झालाय. सिनेमात अमिताभ यांच्याशिवाय प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोन प्रमुख भूमिकेत आहेत. याच वर्षी सिनेमा रिलीज होतोय.

Web Title: Introducing Ashwatthama from Kalki 2898 AD Amitabh bachchan teaser video