धक्कादायक! सेटवर बेशुद्ध पडला अन्... ; वयाच्या ४६ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:17 IST2025-09-19T10:12:35+5:302025-09-19T10:17:14+5:30

Maari Actor Robo Shankar Death: सिनेसृष्टीवर शोककळा! वयाच्या ४६ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन 

famous south actor and comedian robo shankar passed away at the age of 46 | धक्कादायक! सेटवर बेशुद्ध पडला अन्... ; वयाच्या ४६ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन 

धक्कादायक! सेटवर बेशुद्ध पडला अन्... ; वयाच्या ४६ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन 

South Actor Robo Shankar Death: आजचा दिवस उजाडला तो दु:खद बातमी घेऊन.प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते, कॉमेडियन रोबो शंकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असं सांगितलं जातंय की, त्यांना कावीळ झाली होती. अलिकडेच ते  चित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध पडले होते, त्यानंतर त्यांना  एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

रोबो शंकर यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांनाच नाही तर मनोरंजनविश्वातील  कलाकारांना देखील धक्का बसला आहे.काल १८ सप्टेंबरच्या रात्री त्यांचं निधन झालं. अगदी काही दिवसांपूर्वीच ते एका  रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी हजेरी लावली होती.त्यादरम्यान, त्यांची प्रकृती पाहून त्याचे चाहते अक्षरश काळजीत पडले होते.सुपरस्टार कमल हासन यांनी रोबो शंकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांना असं आढळून आले की त्यांना यकृत आणि मूत्रपिंडाचा आजार देखील होता, त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिकट झाली.उपचारादरम्यान, गुरुवारी रात्री ८.३० वाजता त्यांची प्राणज्योती मालवली. 

रोबो शंकर यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या निधनाने पत्नी आणि मुलीला मोठा धक्का बसला आहे. माहितीनुसार,आज शुक्रवारी त्यांच्या अंत्यसंस्कार चेन्नई येथील घरी होतील.

रोबो शंकर यांची कारकीर्द

रोबो शंकर हे दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. पडद्यावरील त्याच्या प्रभावी कामामुळे ते घराघरात लोकप्रिय झाले.दमदार अभिनय आणि त्यालाच विनोदाची जोड देत त्यांनी प्रेक्षकांना कायम खळखळून हसवलं.आपल्या ४६ वर्षांच्या कारकि‍र्दीत त्यांनी साऊथच्या बड्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. 

Web Title: famous south actor and comedian robo shankar passed away at the age of 46

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.