रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर-२' मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:02 IST2025-05-29T15:59:14+5:302025-05-29T16:02:51+5:30
रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या 'जेलर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती

रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर-२' मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका
Jailer-2 Movie: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) गेली अनेक वर्षे बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपटांची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अक्षरश काहीही करायला तयार असतात. दरम्यान, रजनीकांत त्यांचा आगामी प्रोजेक्ट जेलर-२ ('Jailer 2' Movie) मुळे चर्चेत आले आहेत. 'जेलर २'रिलीजच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.याच चित्रपटासंदर्भात आता एक महत्वाची अपडेट समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जेलर-२ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची एन्ट्री झाल्याची माहिती मिळते आहे. 'जेलर २' मध्ये विद्या बालन महत्त्वाची भूमिका तिच्या साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात नागार्जुन आणि बालकृष्ण यांचीही झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. परंतु, याबाबत चित्रपटाने निर्माते तसेच विद्या बालनकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्स करत आहे आणि संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिलं आहे.
रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या 'जेलर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. सुमारे ६५० कोटी रुपयांची कमाई करून हा चित्रपट एक मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता. 'जेलर २' मध्ये रजनीकांत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत जॅकी श्रॉफ आणि साउथ सुपरस्टार मोहनलाल झळकणार आहे. 'जेलर २'ची रिलीज डेट जाहीर झाली नसून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.