रश्मिका-विजयच्या लग्नातील आऊटफिटची चर्चा, डिझायनरने सांगितली कपड्यांची खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:19 IST2026-02-28T11:17:59+5:302026-02-28T11:19:39+5:30
Vijay rashmika wedding look: रश्मिका आणि विजय यांच्या लग्नातील डिझायनर आऊटफिटविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. या दोघांचे आऊटफिट खास पद्धतीने तयार करण्यात आले होते.

रश्मिका-विजयच्या लग्नातील आऊटफिटची चर्चा, डिझायनरने सांगितली कपड्यांची खासियत
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे सध्या या पॉवर कपलची सोशल मीडियावर चर्चा होतीये. रश्मिका आणि विजय यांच्या लग्नातील प्रत्येक गोष्टीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असतांनाच त्यांच्या डिझायनर आऊटफिटविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. या दोघांचे आऊटफिट खास पद्धतीने तयार करण्यात आले होते.
२६ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे रश्मिका-विजय यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. विशेष म्हणजे या दोघांच्या आऊटफिटवर खास डिझाइन करण्यात आली होती. या दोघांचे कपडे डिझाइन करणाऱ्या अनामिका खन्ना यांनी नुकतीच 'हिंदुस्तान टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांच्या आऊटफिट्सचे डिटेल्स शेअर केले.
रश्मिकाच्या कपड्यांवर वास्तुकलेचं चित्र
रश्मिकाने या लग्नसोहळ्यात परिधान केलेल्या दुपट्ट्यावर असलेली डिझाइन ही हैदराबादमधील वास्तुकलेपासून प्रेरित आहे. या दुपट्ट्यावर टेपंल-हाऊस मोटिफ्सचं डिझाइन आहे. तर विजयने आयवरी धोती सिव्हूट सोबत लाल रंगाचा वर्मिलियन कुर्ता परिधान केला होता. विजयच्या या कपड्यांवर जंगल आणि मंदिर यांचं चित्र डिझाइन करण्यात आलं होतं.
''कपड्यांविषयी विजय आणि रश्मिका यांच्या संकल्पना एकदम क्लिअर होत्या. त्यामुळे त्यांची लव्हस्टोरी लुक्समध्ये असावी असं मला वाटलं नाही. कारण, त्यांच्यातलं प्रेम हे आपोआप एकमेकांकडे पाहिलं की दिसून येत होतं. ज्यावेळी मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हाच मला कळून चुकलं की हे काही प्लॅन केलेलं किंवा स्टेज्ड नाहीये. ते खूप नॅच्युरल आणि खूप खरेपणा होता त्यांच्यात'', असं अनामिका म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, "त्यांना कसे कपडे हवेत हे त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आम्हाला फक्त थोडंसं रिसर्च आणि इतिहास यांची जोड त्या कपड्यांना द्यायची होती. यासोबतच ते नवीन ट्रेंड सुद्धा फॉलो करायला तयार होते. त्यामुळे कपड्यांच्या रंगापासून ते प्रत्येक एलिमेंटपर्यंत सगळं काही छान जुळून आलं.''
रश्मिका लग्नात एखाद्या राजकन्येसारखी दिसत होती. तिने नेकलेस, बाजूबंद, माथापट्टी, झुमके असे भरपूर दागिने परिधान केले होते. तसंच हेअरस्टाइल सुद्धा साधी पण तितकीच आकर्षक होती. रश्मिकाने अत्यंत कमी मेकअप केला होता.मात्र, या सगळ्यामुळे तिचा लूक कमालीचा खुलून आला होता.
दरम्यान, रश्मिका आणि विजय यांची पहिली भेट ''गीता गोविंदम'' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. रश्मिका-विजय यांनी तेलुगू पद्धतीने लग्नगाठ बांधली.