अवघ्या काही दिवसात 'पुष्पा:द रुल' बॉक्सऑफिसवर राज्य करणार, मेकर्सने शेअर केली नवी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 17:15 IST2024-01-29T17:12:16+5:302024-01-29T17:15:33+5:30
'पुष्पा 2:द रुल' साठी नेमके किती दिवस शिल्लक राहिले वाचा...

अवघ्या काही दिवसात 'पुष्पा:द रुल' बॉक्सऑफिसवर राज्य करणार, मेकर्सने शेअर केली नवी अपडेट
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) २०२१ साली आलेला 'पुष्पा' (Pushpa) सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला. या सिनेमातील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. आता प्रेक्षकांना पुष्पाचा सीक्वल 'पुष्पा 2' ची प्रतिक्षा आहे. दरम्यान मेकर्सने सिनेमाबद्दल लेटेस्ट अपडेट शेअर केली आहे. 'पुष्पा 2:द रुल' साठी नेमके किती दिवस शिल्लक राहिले आहेत हे मेकर्सने पोस्टरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे.
2021 साली अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने सर्वांनाच वेड लावलं होतं. त्याची स्टाईल अनेक जणांनी कॉपी केली. कित्येकांनी त्यावर रील्सही बनवले. या सिनेमाने अल्लु अर्जुनला वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवलं. शिवाय सिनेमात 'श्रीवल्ली'च्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना 'नॅशनल क्रश'च बनली. दोघंही पॅन इंडिया स्टार म्हणून उदयास आले. गेल्या वर्षी 8 एप्रिल रोजी 'पुष्पा 2' चा टीझर आला. काही मिनिटांच्या या टीझरने सर्वांना अक्षरश: वेड लावलं. काही तासातच टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले. चाहत्यांना आता सिनेमाच्या रिलीजची उत्सुकता आहे.
पुष्पा 2 ची निर्मिती माइथ्री मूवीज बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. आज मेकर्सने सिनेमाबद्दल लेटेस्ट अपडेट शेअर केले आहे. 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रदर्शनाला अवघे २०० दिवस शिल्लक आहेत. म्हणजेच 200 दिवसांनंतर पुष्पा थिएटवर राज्य करणार आहे.
सुकुमारने पुष्पा 2 चं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदाना आणि फहद फाझिलही मुख्य भूमिकेत आहेत. 15 ऑगस्टर 2024 रोजी सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनला दुखापत झाल्याने शूटिंग लांबल्याची माहिती समोर आली होती. आता मात्र रिलीज डेटनुसारच सिनेमा भेटीला येणार हे स्पष्ट झाले आहे.