बाबो! अल्लू अर्जुनने वाढवली फी, आता एका चित्रपटासाठी घेणार 'इतके' कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 14:03 IST2024-04-26T13:44:25+5:302024-04-26T14:03:12+5:30

अल्लू अर्जून याच्या लोकप्रियतेत ‘पुष्पा’ सिनेमानंतर मोठी वाढ झाली.

Allu Arjun Hikes His Fees To ₹150 Crore After Pushpa Success | बाबो! अल्लू अर्जुनने वाढवली फी, आता एका चित्रपटासाठी घेणार 'इतके' कोटी!!

बाबो! अल्लू अर्जुनने वाढवली फी, आता एका चित्रपटासाठी घेणार 'इतके' कोटी!!

अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) साउथचा फार मोठा अभिनेता आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील आहे. अल्लू अर्जून याच्या लोकप्रियतेत ‘पुष्पा’ सिनेमानंतर मोठी वाढ झाली.  या सिनेमामुळे अल्लू अर्जुनला सध्या स्वर्ग दोन बोटांच्या अंतरावर असल्यासारखे झाले आहे. अल्लू अर्जुनची ब्रँड व्हॅल्यू वाढली असून त्याच्या करिअरला नवे वळण मिळाले आहे.

अभिनेता अल्लू अर्जुनची फी आता वाढल्याचे बोलले जात आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने त्याच्या फीमध्ये 30 टक्के वाढ केली आहे. मात्र, या फीबाबत अभिनेत्याकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. आतापर्यंत अल्लू अर्जुन हा त्च्या चित्रपटांसाठी 100 कोटी रुपये घेत होता, आता त्यांची फी वाढली आहे. आता अभिनेत्याने त्याची फी वाढवून 150 कोटी रुपये केली असल्याचे बोलले जात आहे.

'पुष्पा 2' सिनेमा 15 ऑगस्ट 2024 ला रिलीज होणार आहे.  भारतीय मनोरंजन विश्वातील हा एक बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. पुष्पा: द राइज हा सिनेमा 17 डिसेंबर 2017ला रिलीज झाला होता. आता 'पुष्पा 2' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान  'पुष्पा 2' चे स्ट्रीमिंग अधिकार 275 कोटी रुपयांना विकले आहेत.  OTT प्लॅटफॉर्म Netflix ने हा करार केला आहे. 

Web Title: Allu Arjun Hikes His Fees To ₹150 Crore After Pushpa Success