समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:13 IST2025-01-25T13:11:01+5:302025-01-25T13:13:19+5:30

'पुष्पा ३'मधील आयटम साँगसाठी या अभिनेत्रीच्या नावाची सध्या चांगलीच चर्चा आहे (pushpa 3)

after samantha srileela janhavi kapoor will be dance on pushpa 3 item song | समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव

समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव

'पुष्पा २' अजूनही थिएटरमध्ये हाउसफुल्ल प्रतिसादात सुरु आहे. 'पुष्पा २' पाहायला लोक अजूनही थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. नवीन वर्षात 'पुष्पा २'ला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळेल असं बोललं जात असतानाच मेकर्सने 'पुष्पा २'चं रिलोडेड अर्थात एक्ट्रा फूटेज असलेलं व्हर्जन रिलीज केलं आणि पुन्हा एकदा 'पुष्पा २' बघायला प्रेक्षकांची गर्दी झाली. अशातच 'पुष्पा ३'ची चर्चाही सध्या सुरु आहे. इतकंच नव्हे तर 'पुष्पा ३'मध्ये आयटम साँगमध्ये कोण दिसणार, याचंही नाव समोर आलंय. 

ही अभिनेत्री 'पुष्पा ३'मध्ये आयटम साँगवर थिरकणार

'पुष्पा ३'ची घोषणा 'पुष्पा २'च्या एंड क्रेडीटला झाली. त्यामुळे सर्वांची उत्सुकता चाळवली गेलीय. अशातच 'पुष्पा ३'मध्ये आयटम साँगमध्ये कोणती अभिनेत्री दिसणार याचा खुलासा झालाय. मेकर्स सध्या 'पुष्पा ३'मधील आयटम साँगसाठी जान्हवी कपूरवर शिक्कामोर्तब लावणार असल्याचं समजतंय. अर्थात याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाहीये. जान्हवीने अलीकडेच 'देवरा पार्ट १' या पॅन इंडिया सिनेमात ज्यु. एनटीआरसोबत अभिनय केला. त्यामुळे जान्हवीची सध्या साउथ इंडस्ट्रीतही चांगलीच क्रेझ आहे.

जान्हवी ही अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. जान्हवीने गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आणि साउथ इंडस्ट्रीतही स्वतःचं स्थान निर्माण केलंय. त्यामुळे 'पुष्पा ३'चे म्यूझिक डायरेक्टर देवी श्रीप्रसाद हे 'पुष्पा ३'मधील आयटम साँगसाठी जान्हवी कपूरशी बोलत असल्याचं समजतंय. 'पुष्पा ३' सिनेमा पुढील वर्षी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Web Title: after samantha srileela janhavi kapoor will be dance on pushpa 3 item song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.