प्रदर्शनापूर्वीच रणवीरच्या 'धुरंधर २' ने केलं वातावरण टाईट; 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेट बदलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:05 IST2026-03-11T14:01:34+5:302026-03-11T14:05:36+5:30
रणवीरच्या 'धुरंधर २' चा प्रदर्शनापूर्वीच दबदबा! 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेटमध्ये बदल

प्रदर्शनापूर्वीच रणवीरच्या 'धुरंधर २' ने केलं वातावरण टाईट; 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेट बदलली
Adi Vishesh And Mrunal Thakur Cinema: अभिनेता रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला धुरंधर हा सिनेमा खूप गाजला. ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या स्पाय अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर गारुड घातलं. २०२५ मधील सुपरहिट सिनेमांपैकी धुरंधर हा एक चित्रपट ठरला. पहिल्या भागच्या यशानंतर लवकरच धुरंधर २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्याआधीच या चित्रपटाने आपला दबदबा निर्माण केला आहे.'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर, अनेक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
'धुरंधर'च्या दमदार कामगिरीनंतर आता येत्या १९ मार्चला चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आदित्य धरच्या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच सुमारे २३ कोटींची कमाई केली आहे. याचा आपल्या व्यवसायाला फटका बसू नये म्हणून अनेक सिनेमांची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यशचा 'टॉक्सिक' सिनेमा 'धुरंधर २' सोबत रिलीज होणार होता. परंतु 'टॉक्सिक'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. धुरंधरची ही क्रेझ पाहून आता आणखी एका बड्या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख बदलल्याचं समोर आलं आहे.या चित्रपटाचं नाव डकैत आहे.
दाक्षिणात्य अभिनेता अदिवी शेष आणि मुणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला डकैत (Dacoit) हा सिनेमा १९ मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज होणार होता. मात्र, आता डकैतच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. अभिनेता आदिवी शेषने सोशल मीडियाद्वारे रिलीज डेट बदलल्याची घोषणा केली आहे.आता हा चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.
'डकैत: अ लव्ह स्टोरी' हा चित्रपट सिनेमॅटोग्राफर शेनेल देव यांनी दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटात जेलमधील एका कैद्याची कथा दाखवण्यात आली आहे. ज्याला त्याच्या प्रेयसीवर सूड उगवायचा प्रयत्न करतो. कारण,त्याला वाटतं की तिने त्याचा विश्वासघात केला आहे. त्यांच्यामध्ये नेमकं काय बिनसलं, त्यांच्या नात्यात दरी कशी निर्माण झाली? यावर कथानक गुंफण्यात आलं आहे.