दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलाचं झालं बारसं; नाव ठेवलंय खूपच खास, तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 16:55 IST2025-10-02T16:53:34+5:302025-10-02T16:55:46+5:30
दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचं बारसं झालं आहे. अभिनेत्रीने मुलाचं ठेवलेलं खास नाव बघून तुम्हीही कराल कौतुक

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलाचं झालं बारसं; नाव ठेवलंय खूपच खास, तुम्हीही कराल कौतुक
स्टार कपल वरुण तेज (Varun Tej) आणि लावण्या त्रिपाठी (Lavanya Tripathi) यांनी त्यांच्या बाळाच्या नामकरण समारंभातून काही सुंदर फोटो आणि एक खास व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. हे जोडपं मुलाचं नाव काय ठेवणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर त्यांनी आपल्या मुलाचं बारसं केलं असून एक खास नाव ठेवलंय
वरुण आणि लावण्याने मुलाचं नाव काय ठेवलं?
वरुण आणि लावण्याने आपल्या मुलाचं नाव 'वायुव' (Vaayuv) असं ठेवलं आहे. पवनपुत्र हनुमान यांच्या नावावरुन वायुव हे नाव ठेवण्यात आलं आहे. आज विजयादशमीच्या (Dussehra) शुभ मुहूर्तावर वरुण तेज आणि लावण्या यांनी त्यांच्या मुलाचं नामकरण केलं. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि दोन सुंदर फोटो शेअर करून आपल्या मुलाचं नाव 'वायुव तेज कोनिडेला' असल्याचं जाहीर केलं.
लावण्या आणि वरुण यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओची सुरुवात हनुमानजींच्या प्रतिमेने आणि हनुमान चालिसाच्या काही ओळींनी होते. त्यानंतर व्हिडिओमध्ये बाळाच्या नावाच्या निवडीबद्दल सांगितलं आहे: "एक नाव जे शक्ती, भक्ती, साहस आणि आध्यात्मिक तेजाचे प्रतीक आहे. भगवान हनुमानाला स्मरुन, आम्ही मुलाचा म्हणजेच 'वायुव तेज कोनिडेला' म्हणून परिचय करून देत आहोत."
शेअर केलेल्या फोटोंमध्ये वरुण आणि लावण्या आपल्या मुलावर प्रेम करताना दिसत आहेत. नामकरण समारंभात लावण्याने सोनेरी-नारंगी रंगाची साडी परिधान केली होती, तर वरुण तेज कुर्त्यामध्ये दिसला. वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी इटलीमध्ये विवाह केला होता आणि गेल्या महिन्यात १० सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलाचा जन्म झाला. 'मिस्टर' या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली आणि पाच वर्षांहून अधिक काळ हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते.