खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 09:41 IST2025-05-25T09:39:51+5:302025-05-25T09:41:17+5:30

खासदार असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री पतीसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या असून अभिनेत्रीचं दुसरं लग्नही मोडणार, अशी शक्यता आहे

actress and MP nusrat jahan divorce her husband yash dasgupta details inside | खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा

खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा

बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां (nusrat jahan) आणि अभिनेता यश दासगुप्ता यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सध्या जोरात आहेत. अलीकडेच यशने नुसरतला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केल्यामुळे या चर्चांना अधिक जोर मिळाला आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीचा पती यशचा त्याची एक्स प्रेमिका पूनमसोबत जवळीक वाढल्याने नुसरत त्याच्यासोबत घटस्फोट घेणार अशी शक्यता आहे. नुसरतने याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

नुसरतने लिहिला भगवद्गीतेचा श्लोक

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नुसरतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये भगवद्गीतेतील एक श्लोक शेअर केला आहे: "सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" याचा अर्थ "जे आपल्या हातात नाही अन् नियंत्रणात नाही त्यासमोर समर्पण करा; यामुळे शांती आणि स्वातंत्र्य मिळते." या पोस्टमुळे नुसरत आणि यश यांच्या नात्यात सध्या किती तणाव आहे, याचा अभिनेत्रीच्या चाहत्यांनी अंदाज बांधला आहे. नुसरत आणि यश यांना एक मुलगा असून त्याचे नाव यिशान आहे.

एक्स के चक्कर में पड़ा एक्टर, इस मुस्लिम एक्ट्रेस का टूट रहा घर! बोलीं- जो वश में न हो...

सध्या घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. नुसरतने यश दास गुप्तासोबत दुसरं लग्न केलं. नुसरतने याआधी निखिल जैनसोबत लग्न केलं होतं. परंतु या लग्नाला भारतात कायदेशीर मान्यता न मिळाल्याने दोघे वेगळे झाले. आता नुसरतचं दुसरं लग्नही घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. नुसरतचा पती यश त्याच्या ex गर्लफ्रेंडसोबत संपर्कात आहे. हीच गोष्ट नुसरतला अस्वस्थ करत आहे. यामुळे या दोघांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला असून दुरावा आला आहे. नुसरत आणि यश खरंच घटस्फोट घेणार का? हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.

Web Title: actress and MP nusrat jahan divorce her husband yash dasgupta details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.