मुलगी झाली हो! लग्नाच्या चार वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, पत्नी आहे जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:53 IST2025-04-22T13:53:09+5:302025-04-22T13:53:28+5:30
इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याला मुलगी झाली असून त्याने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केलीय (vishnu vishal)

मुलगी झाली हो! लग्नाच्या चार वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, पत्नी आहे जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू
तमिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विष्णु विशाल (vishnu vishal) आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (jwala gutta) यांच्या घरी गोंडस कन्येचं आगमन झालं आहे. योगायोग म्हणजे २२ एप्रिल २०२५ रोजी या विष्णु आणि ज्वाला यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता. त्याचदिवशी या दोघांच्या आयुष्यात कन्यारत्नाचं आगमन झालंय. या खास दाम्पत्याच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी त्यांच्या कुटुंबात हा नवा आनंद निर्माण झाला आहे.
विष्णुने सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद
विष्णु विशालने सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केलीय. सोशल मीडियावर विष्णु लिहितो की, "आम्हाला एका गोड मुलीचा आशीर्वाद लाभला आहे. आज आमच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे आणि याच दिवशी आमचं आयुष्य अधिक सुंदर झालं आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव हवेत." या पोस्टसोबत विष्णुने हृदयस्पर्शी फोटो शेअर केलाय. फोटोमध्ये नवजात बाळाचा नाजूक हात ज्वाला आणि विष्णुच्या हातामध्ये दिसतो आहे. विष्णुने ही गूड न्यूज देताच सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.
साउथ सुपरस्टार विष्णु विशाल आणि ज्वाला गुट्टाचा विवाह २२ एप्रिल २०२१ रोजी हैदराबादमध्ये पार पडला होता. विष्णुचा हा दुसरा विवाह आहे. विष्णुला पहिल्या पत्नीपासून आर्यन नावाचा एक मुलगा आहे. सध्या विष्णु विशाल त्याच्या आगामी ‘इरंडू वानम’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ममिता बायजू मुख्य भूमिका साकारत आहे. विष्णुची पत्नी ज्वाला गुट्टा ही आंतरराष्ट्रीय किर्तीची बॅडमिंटनपटू असून तिने देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं आहे.