हिरोच असतो व्हिलन! २ तास ३५ मिनिटांचा 'हा' मिस्ट्री-थ्रिलर सिनेमा पाहून 'दृश्यम' अन् 'अंधाधुन' विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:28 IST2025-09-30T15:23:46+5:302025-09-30T15:28:51+5:30
२०२५ मधील सर्वोत्तम मिस्ट्री-थ्रिलर सिनेमा ओटीटीवर आहे ट्रेंडिंग! तुम्ही पाहिलात का?

हिरोच असतो व्हिलन! २ तास ३५ मिनिटांचा 'हा' मिस्ट्री-थ्रिलर सिनेमा पाहून 'दृश्यम' अन् 'अंधाधुन' विसराल
OTT Trending Movie Elevan: आजकाल ओटीटीवर केवळ बॉलिवूडचं नव्हे, तर साऊथ इंडियन सिनेमांपासून ते परदेशी सिनेमांपर्यंत गाजलेले सिनेमे उपलब्ध आहेत.सध्या एका मिस्ट्री-थ्रिलर सिनेमाची डिजीटल प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट २०२५ मधील सर्वोत्तम मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट ठरला आहे. जेव्हा मिस्ट्री-थ्रिलर चित्रपटांबद्दल बोललं जातं तेव्हा पहिल्यांदा डोळ्यासमोर दृश्यम आणि अंधाधुन चित्रपटांची नावं येतात.मात्र,ओटीटीव एका साऊथ सिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 'इलेव्हन' असं या बहुचर्चित चित्रपटाचं नाव आहे.
लोकेश अजल्स दिग्दर्शित हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर या चित्रपटाने ओटीटीवर दबदबा निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता नवीन चंद्रा, अभिरामी, रवि वर्मा, कीर्ती, शशांक आणि रिया यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील प्रत्येक सीन खिळवून ठेवणारा आहे.
या संपूर्ण चित्रपटाचं कथानक सिरीअल किलरभोवती फिरतं.या सिरीयल किलरला पकडण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी अरविंद (नवीन चंद्रा) कडे सोपविण्यात येते. दोन जुळ्या भावांची हृदयस्पर्शी कहाणी यात दाखवण्यात आली आहे. त्यातील एकाचा शाळेत एका अपघातात मृत्यू होतो. मध्यंतरानंतर, कथेला एक वळण लागतं आणि क्लायमॅक्समध्ये, नायक खलनायक असल्याचे उघड होतं. "इलेव्हन" हा चित्रपट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये ट्रेंड करत आहे.