"दीपिका माझ्यासाठी लकी चार्म...", साऊथ दिग्दर्शकाकडून अभिनेत्रीचं भरभरुन कौतुक, म्हणाला- "आई झाल्यानंतर ती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:37 IST2026-01-27T17:37:27+5:302026-01-27T17:37:55+5:30

दीपिका साऊथ दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या AA22XA6 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिकाचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. दीपिका माझ्यासाठी लकी चार्म असल्याचं नुकतंच साऊथ दिग्दर्शक अ‍ॅटलीने म्हटलं आहे. 

south director atlee kumar said deepika padukone is lucky charm for me | "दीपिका माझ्यासाठी लकी चार्म...", साऊथ दिग्दर्शकाकडून अभिनेत्रीचं भरभरुन कौतुक, म्हणाला- "आई झाल्यानंतर ती..."

"दीपिका माझ्यासाठी लकी चार्म...", साऊथ दिग्दर्शकाकडून अभिनेत्रीचं भरभरुन कौतुक, म्हणाला- "आई झाल्यानंतर ती..."

दीपिका पादुकोण बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे. पदार्पणातूनच ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर दीपिकाचा भाव वाढला. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. आता दीपिका साऊथ दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या AA22XA6 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिकाचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. दीपिका माझ्यासाठी लकी चार्म असल्याचं नुकतंच साऊथ दिग्दर्शक अ‍ॅटलीने म्हटलं आहे. 

जवान सिनेमानंतर अ‍ॅटली पुन्हा एकदा दीपिका पादुकोणसोबत काम करत आहे. हा दोघांचा दुसरा सिनेमा असून एका मुलाखतीत अ‍ॅटलीने दीपिकाचं भरभरुन कौतुक केलं. तो म्हणाला, "ती माझी लकी चार्म आहे. दीपिकासोबत ही माझी दुसरी फिल्म आहे आणि तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच अप्रतिम असतो. ती खरंच कमाल आहे. आई झाल्यानंतर ती या चित्रपटातून पुनरागमन करत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की यावेळी प्रेक्षकांना दीपिकाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळेल. या चित्रपटात प्रेक्षकांना दीपिका पादुकोणचा एक पूर्णपणे नवा अवतार पाहायला मिळणार असल्याचंही अ‍ॅटलीने सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत आणि चित्रपटाच्या कथेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अ‍ॅटलीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटात अल्लू अर्जुनही झळकणार आहे. जरी AA22XA6 संदर्भातील अधिक तपशील अद्याप उघड झाले नसले, तरी अ‍ॅटलीची भव्य दृष्टी आणि दीपिका पादुकोणची स्टार पॉवर यामुळे अपेक्षा आधीच प्रचंड वाढल्या आहेत. दीपिका पादुकोणकडे यंदा आणखी एक मोठा प्रोजेक्टही आहे. ती ‘किंग’ या चित्रपटात झळकणार असून, हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिची पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत जोडी जमली आहे. 

Web Title : दीपिका मेरे लिए लकी चार्म: साउथ निर्देशक ने की अभिनेत्री की प्रशंसा

Web Summary : निर्देशक एटली ने दीपिका पादुकोण की प्रशंसा करते हुए उन्हें अपना लकी चार्म बताया। 'जवान' के बाद फिर से साथ काम करते हुए, वह अल्लू अर्जुन के साथ अपनी आगामी फिल्म में मातृत्व के बाद उनकी शानदार वापसी की उम्मीद करते हैं। उनका मानना है कि दर्शक दीपिका का एक बिल्कुल नया रूप देखेंगे।

Web Title : Deepika is my lucky charm: South director praises actress.

Web Summary : Director Atlee praises Deepika Padukone, calling her his lucky charm. Working together again after 'Jawan,' he anticipates a remarkable comeback for her post-motherhood in their upcoming film with Allu Arjun. He believes audiences will see a completely new side of Deepika.