प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा अमेरिकेत अपघात, हात फ्रॅक्चर; सुशांतसिंह राजपूतसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 02:56 PM2024-03-28T14:56:54+5:302024-03-28T14:58:27+5:30

34 वर्षीय 'या' अभिनेत्याचा अमेरिकेत अपघात

South Actor Naveen Polishetty met with an accident in America Fractured Arm | प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा अमेरिकेत अपघात, हात फ्रॅक्चर; सुशांतसिंह राजपूतसोबत केलंय काम

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा अमेरिकेत अपघात, हात फ्रॅक्चर; सुशांतसिंह राजपूतसोबत केलंय काम

दाक्षिणात्य अभिनेता नवीन पॉलीशेट्टीचा (Naveen Polishetty) अमेरिकेत अपघात झाल्याची घटना घडली आहे. अभिनेता बाईक चालवत होता तेव्हा अपघात झाला. यामध्ये त्याला गंभीर मार लागला आहे. याविषयी त्याच्या टीमने माहिती दिली आहे. अद्याप त्याच्या सोशल मीडियावरुन कोणतंही अपडेट मिळालेलं नाही. सुदैवाने तो या अपघातातून वाचला आहे.

34 वर्षीय नवीन पॉलीशेट्टीच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या डलास येथील भागात अभिनेता बाईकवरुन जात होता. अचानक बाईक घसरली त्याचं नियंत्रण सुटलं आणि तो पडला. यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या तब्येतीविषयी पुढील अपडेट देण्यात येईल.

नवीन पॉलीशेट्टीने हिंदी सिनेमातही काम केलं आहे. सुशांतसिंह राजपूतचा गाजलेला 'छिछोरे' सिनेमात तो झळकला होता. तर गेल्याच वर्षी त्याचा 'मिस शेट्टी मिस्टर पॉलीशेट्टी' या रोमँटिक कॉमेडी सिनेमातही दिसला. सध्या तो श्रीलीला यांच्यासोबत कल्याण शंकर यांच्या 'अनागानागा ओका राजू' सिनेमाचं शूटिंग करत होता. नवीन अभिनेतासोबतच पटकथा लेखकही आहे. 

Web Title: South Actor Naveen Polishetty met with an accident in America Fractured Arm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.