सोनू कक्करच्या पोस्टनंतर सगळीकडे सुरू आहे एकच चर्चा, 'सिबलिंग डिवोर्स' म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:02 IST2025-04-14T17:53:18+5:302025-04-14T18:02:28+5:30
सध्या प्रत्येकाच्या ओठांवर एकच शब्द आहे, तो म्हणजे 'सिबलिंग डिवोर्स' (भावंडांचा घटस्फोट).

सोनू कक्करच्या पोस्टनंतर सगळीकडे सुरू आहे एकच चर्चा, 'सिबलिंग डिवोर्स' म्हणजे काय?
Sibling Divorce: लोकप्रिय गायिका गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्करशी नातं तोडल्याचं सांगितलं. सोनूच्या या पोस्टने सर्वांनाच धक्का बसला. "तुम्हाला कळवताना दुःख होत आहे की, यापुढे मी दोन टॅलेंटेड सुपरस्टार टोनी कक्कर (Tony Kakkar) आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. भावनिक वेदनांमधून मी हा निर्णय घेतला आहे आणि आज मी खरोखरच निराश आहे", असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं. पण, काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली. पण तिच्या या पोस्टनंतर 'सिबलिंग डिवोर्स' हा शब्द चर्चेत आला आहे. नेमकी काय आहे ही संज्ञा? याबद्दल जाणून घेऊया.
पती-पत्नीमधील घटस्फोटाबद्दल सर्वांनी ऐकलंच आहे. पण, 'सिबलिंग डिवोर्स' काय आहे? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर जेव्हा भावंडांमधील नाते बिघडते किंवा ते एकमेकांपासून भावनिकदृष्ट्या दूर जातात, तेव्हा हे भाव दर्शवण्यासाठी 'सिबलिंग डिवोर्स' ही संज्ञा वापरतात. 'सिबलिंग डिवोर्स' म्हणजे ज्यात भाऊ आणि बहिणींचे एकमेकांशी कोणतेही नाते नाही. हा कायदेशीर शब्द नाही. सोनू कक्करच्या पोस्टनंतर नेहा आणि टोन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या सगळ्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान बहीण-भावांमध्ये नेमकं काय बिनसलंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे. तर काहींनी सोनूचा अकाऊंट हॅक झाल्याचं म्हटलंय. सोनू कक्कर, टोनी कक्कर आणि नेहा कक्कर ही तिन्ही भावंड उत्तम गायक आहेत. नेहा आणि टोनी या दोघांसोबत तिने अनेक गाणी गायली आहेत. तर सोनू अनेक गायनाच्या रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून उपस्थित राहिली आहे.