गडबडीत डोक्याला गुंडाळलेल्या टॉवेलसह श्रुती पडली घराबाहेर, हा फोटो पाहून तुम्हालाही येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 04:42 PM2024-05-26T16:42:19+5:302024-05-26T16:43:43+5:30

श्रुतीच्या अगदी सहज आणि उत्कृष्ट अभिनयामुळे तिचा वेगळा चाहतावर्ग आहे.

Shruti Haasan Steps Out With Towel On Head In Hurry Watch Pic | गडबडीत डोक्याला गुंडाळलेल्या टॉवेलसह श्रुती पडली घराबाहेर, हा फोटो पाहून तुम्हालाही येईल हसू

गडबडीत डोक्याला गुंडाळलेल्या टॉवेलसह श्रुती पडली घराबाहेर, हा फोटो पाहून तुम्हालाही येईल हसू

अभिनेत्री श्रुती हसन तिच्या अभिनयाइतकीच बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. मोजक्याच चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय करून श्रुती हसननं फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच स्थान निर्माण केलंय. श्रुतीच्या अगदी सहज आणि उत्कृष्ट अभिनयामुळे तिचा वेगळा चाहतावर्ग आहे. श्रुती सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र, अलीकडे तिचा एक फोटो व्हायरल झालाय. हा फोटो पाहून तुम्हालाही हसू येईल. श्रुतीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतः हा मजेशीर फोटो शेअर केला आहे. 

श्रुती कामासाठी घरुन घाईगडबडीत निघाली खरी, पण आपल्या डोक्यावर टॉवले आहे, हे तिच्या लक्षातच आलं नाही. अंघोळीनंतर डोक्यावर गुंडाळलेल्या टॉवेलसह श्रुती गाडीत बसली. पण, काही वेळताच तिच्या हे लक्षात आलं की आपण डोक्यावरून टॉवेल काढायला विसरलो आहोत. याचा एक फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केला. यात तिच्या डोक्याभोवती टॉवेल गुंडाळलेला दिसून येत आहे.

 

फोटो शेअर करताना श्रुतीने कॅप्शनमध्ये लिहलं, 'किती गोंधळून गेले आहे. मी घाईघाईने डोक्यावर गुंडाळलेला टॉवेल घेऊन बाहेर आले'. आपल्या या विसरभोळेपणावर श्रुतीलाही हसू आलं.  श्रुती हासन तिच्या एका रिहर्सलला जात होती आणि घाईघाईत तिच्याकडून ही चूक झाल्याचं दिसतंय. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

श्रुती हसनचं नुकतंच तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिकासोबत ब्रेकअप झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या, मात्र तिनं यावर बोलणं टाळल होतं. श्रुती हसन आणि शंतनू हजारिका लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, परंतु त्यांनी एप्रिलमध्ये इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. यासोबत चाहत्यांच्या एक प्रश्नाला उत्तर देताना श्रुतीनं ती सिंगल असल्याचं सांगितलं होतं. तिच्या या उत्तरावरुन दोघांचं नात संपल्याचं स्पष्ट झालं. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्रुती रजनीकांतसोबत 'कुली' नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. 
 

Web Title: Shruti Haasan Steps Out With Towel On Head In Hurry Watch Pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.